सातारा : दोन वर्षापूर्वी महिलेवर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन फरारी असलेल्या अप्पा उर्फ परमेश्वर महादेव मुलगे (वय 32, रा. गुरुदत्त कॉलनी, संगमनगर, सातारा) याला सातारा वाहतूक विभागाच्या कर्मचार्याने शिताफीने पकडून अटक केली. दरम्यान, संशयितासह यापूर्वीच चौघांना अटक झाली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अप्पा मुलगे हा दोन वर्षापूर्वी बॉम्बे रेस्टॉरंट येथे त्याच्या आणखी चार साथीदारांसोबत रात्री मद्यप्राशन करीत बसला होता. मद्यप्राशन करण्यासाठी ग्लास व पाणी नसल्याने परिसरात असणार्या पालातील लक्ष्मी मथिया यांना ग्लास व पाणी मागितले. ही महिला कष्टकरी असून मूर्ती बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्रीची वेळ असल्याने महिलेने पाणी व ग्लास देण्यास नकार दिला. यावेळी पाचही संशयितांनी महिलेशी वादावादी, शिवीगाळ व दमदाटी करुन तेथून निघून गेले. सुमारे पंधरा मिनिटानंतर मात्र अप्पा मुलगे याच्यासह सर्व संशयित कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेवून त्या महिलेच्या घरी गेले. तू पाणी व ग्लास का दिला नाहीस, असे म्हणून चिडून या पाचजणांनी कोयत्याने या महिलेच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात तक्रारदार महिला लक्ष्मी मथिया या गंभीर जखमी झाल्या होत्या. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता.
महिलेवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर अप्पा मुलगे पसार होता. दि. 21 सप्टेंबर रोजी सातारा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे यांना अप्पा मुलगे याची माहिती मिळाली. सपोनि सुरेश घाडगे यांना याबाबतची माहिती देवून एक होमगार्ड सोबत घेवून बॉम्बे रेस्टॉरंट येथे जावून शिंदे यांनी पाहिले असता अप्पा मुलगे निदर्शनास आला. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले. अप्पा मुलगे हा दोन वर्षापासून पोलिसांना हवा असल्याचे समोर आल्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |