01:25am | Aug 28, 2018 |
कराड : पत्रकार विकास जाधव यांना उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार शहाजी पाटील व रविंद्र पवार यांनी सराईत गुन्हेगार असल्याप्रमाणे दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात कराडसह जिल्ह्यातील पत्रकारांनी निषेध नोंदवला होता. कराड तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक पत्रकारांनी मोर्चा काढून हवालदार शहाजी पाटील व रविंद्र पवार यांच्या निलंबनाची मागणी केली होती. अपमानास्पद वागणूक देणारे हवालदार शहाजी पाटील यांची उंब्रजहून सातारा मुख्यालयात उचलबांगडी केली आहे. तसे बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत.
उंब्रज, ता. कराड येथे दि. ४ ऑगस्ट रोजी एस.टी. बसमध्ये घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्याच्या अनुषंगाने छायाचित्र काढत असताना उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार शहाजी पाटील व रविंद्र पवार या दोन कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च भाषा वापरुन जाधव यांना अवमानकारक वागणूक दिली होती. विकास जाधव दि. ४ ऑगस्टला काशीळकडे त्यांच्या दूचाकीवरून निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली होती. जाधव यांनी पत्रकार असल्याचे ओळख पत्र दाखवूनही त्यांनी त्यांना सोडले नाही. त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. उंब्रज पोलिसांच्या मुजोरीपणाच्या विरोधात जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली. कराडसह जिल्ह्यातून त्याचा निषेध व्यक्त झाला. संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीसाठी कराड तालुक्यातील शंभरहूनही अधिक पत्रकारांनी पोलीस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला.
पोलिस अधीक्षक देशमुख यांनी प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांना दिले होते. त्यानुसार याप्रकरणी ढवळे यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी हवालदार शहाजी पाटील यांची सातारा मुख्यालयात बदली केली आहे. त्या बदलीचे लेखी आदेश पोलिस उपाधीक्षक ढवळे यांना सोमवारी प्राप्त झाले आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |