कोलंबो : मानसी नाईक (3/16) हिची शानदार गोलंदाजी आणि स्मृती मानधनाच्या झुंजार 73 धावांच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने 9 विकेटनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणार्या श्रीलंकेला 35.1 षटकांत केवळ 98 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 19.5 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंका कर्णधाराचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. भारतीय गोलंदाजीपुढे त्यांच्या सर्वच फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यांच्या चमारी अट्टापट्टू (33) आणि श्रीपल्ली वेराकोड्डी (26) या दोघींशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
दुखापतीमुळे खूप दिवस मैदानाबाहेर असलेल्या मानसीने उत्कृष्ट पुनरागमन करताना केवळ 16 धावांत तीन विकेट घेतल्या. याशिवाय, झुलन गोस्वामीने आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
श्रीलंकेकडून मिळालेले लक्ष्य गाठणे भारतासाठी अतिशय सोपे ठरले. स्मृती मानधना (73) आणि पूनम राउत (24) यांनी 19.5 षटकांत ही धावसंख्या पार केली. या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा वन-डे सामना 13 सप्टेंबर रोजी खेळवला जाणारा आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |