RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पुण्याच्या ऋतुजाला थायलंडची शिष्यवृत्ती!

10 August 2018 at 16:26

पुणे : "अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो सारी कायनात तुम्हे उससे मिलाने में जुट जाती है," हा डायलॉग सिनेमातील असला तरी तो पुण्यातील एका मुलीने खरा करुन दाखवला आहे. पुण्यातील 17 वर्षीय ऋतुजा भोईटेला पाहिल्यावर, तिच्याबद्दल समजल्यानंतर याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एका रिक्षाचालकाची मुलगी, जी आयुष्यभर शरीरावरील कोड या त्वचारोगाचा न्यूनगंड घेऊन जगली, त्या ऋतुजाने थायलंडमधील युनायटेड वर्ल्ड्स कॉलेजची पूर्णवेळ शिष्यवृत्ती मिळवली आहे.

कुटुंबाची प्रतिकूल परिस्थिती

ऋतुजा तिच्या आई-वडील आणि भावंडांसह पुण्यातील कोंढवा परिसरात राहते. ऋतुजाच्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न अवघं दहा हजार रुपये आहे. तिचे वडील अरुण भोईटे हे रिक्षाचालक आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आई नंदा यांनी घरातच ब्युटी पार्लर सुरु केलं. परंतु पाठीच्या दुखण्यामुळे त्यांना हा व्यवसाय थांबवावा लागला. यानंतर आता तिचे आई-वडील भाजी विकतात.

महापालिकेच्या शाळेत शिक्षण

ऋतुजाने पुण्यातील महापालिकेच्या संत गाडगे महाराज इंग्लिश मिडीयम शाळेत नववीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने पुण्याजवळील अवसरा अकादमीमध्ये प्रवेश घेतला. ही शाळा मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींची  निवड करते, शिवाय गरज असेल तर त्यांना आर्थिक मदतही करते.

शैक्षणिक आयुष्यात ऋतुजा अतिशय लाजाळू पण हुशार विद्यार्थिनी होती. पण आता तिला बोलताना पाहिल्यानंतर ती एकेकाळी लोकांचा सामना करण्यास घाबरत असे, यावर विश्वासही बसणार नाही. "शरीरावर कोड असल्याने लोक मला स्वीकारतील की नाही," याची मला सतत भीती असायची असं ऋतुजा सांगते.

मायाने आयुष्य बदललं!

मे, 2013 मध्ये टीच फॉर इंडियाच्या (टीएफआय) ब्रॉडवे-स्टाईल म्युझिकल 'माया'साठी माझी निवड झाली. यात पुण्यातील वेगवेगळ्या शाळांमधील 30 विद्यार्थी सहभागी होतात. "मायाने माझं आयुष्य बदललं. माझ्या वागण्याबोलण्यात बदल झाला. धाडस, सहानुभूती आणि बुद्धीची किंमत मला समजली. मी मनमोकळेपणाने वागायला शिकले, नव्या लोकांसोबत बोलायला लागले," असं ऋतुजा म्हणाली.

दोन वर्षांची शिष्यवृत्ती

परदेशी जाऊन शिक्षण घेणारी ऋतुजा ही त्यांच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे. या शिष्यवृत्तीसाठी तिला दोन टप्प्यातील निवड प्रक्रिया, यामध्ये परीक्षा, मुलाखत, फॅकल्टी इंटरव्हू, टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटी आणि ग्रुप डिस्कशनमधून जावं लागलं. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्याची बातमी 29 मार्च रोजी समजली. या महिन्यातच तिच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. तिचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असेल. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये जगभरातील विविध देशांमधील विद्यार्थी एकत्र येतात. ऋतुजा इथे बायोलॉजी, मॅथ्स आणि फ्रेन्च भाषा शिकणार आहे.

शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा

"मी अभिमानाने जात आहे. आयुष्यातील आव्हानांचा मी माझ्या परीने प्रचंड मेहनत करुन सामना केला आहे. त्यामुळे युनायटेड वर्ल्ड्स कॉलेजची शिष्यवृत्ती हे मी मलाच दिलेलं कृतज्ञेचं चिन्ह आहे," असं ऋतुजा सांगते. ऋतुजाला भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे. शाळांमधील अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये तिला प्रयोग करायचा आहे.

जेव्हा लोक तिच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायचे

"ती फार दूर जात आहे," हे सांगताना ऋतुजाच्या आईचे डोळे भरुन येतात. "कोड या रोगाविरुद्ध लढताना तिची धडपड मी पाहिली आहे. त्यावरील उपचार फार वेदनादायी होते. या परिस्थितीतही तिने अभ्यास सुरु ठेवला. जन्मत:च हुशार असलेली ऋतुजा सुट्टीच्या दिवशी शेजारच्या मुलांना शिकवते. ती इतरांपेक्षा वेगळी नाही, किंवा कमी नाही हे मी कायम तिला सांगते. एक काळ होता, जेव्हा लोक तिच्या वेगळ्या पद्धतीने पाहायचे पण आता नाही," असं तिची आई म्हणाली.

इंग्लिशवरील प्रभुत्व आश्चर्यकारक

"ऋतुजाचं इंग्लिशवरील प्रभुत्व पाहून तिच्या वडिलांना आश्चर्य वाटलं. ती एवढं चांगलं इंग्लिश बोलायला कुठे शिकली, याची मला कल्पनाच नाही," असं सांगताना तिच्या वडिलांचा ऊर अभिमानाने भरुन येतो. ऋतुजाने तिच्या शैक्षणिक वर्षांच्या प्रत्येक टप्प्यात शिष्यवृत्ती मिळवली आहे. मला तिच्याकडून आणखी काय हवं. तिला हवं तेवढं तिने शिकावं, लग्नासाठी बरीच वर्ष आहेत, असं अरुण भोईटे यांनी सांगितलं.

राज्यात 24962 मेगावॉट विजेच्या मागणीचा विक्रम

ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे राज्यात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला असून सोमवारी, दि. 22 रोजी तब्बल 24962 मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली.

10 hours before

एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांकडून दिवाळी भेट

एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

12 hours before

पाच दिवसांचा आठवडा केल्यास कामाचे तास वाढतील

चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारने आठवड्याच्या कामाचे तास 40 करावेत, असा निर्णय घेतला.

20 October 2018 at 19:54

जेजुरी गडावर दसऱ्यानिमित्त 18 तास मर्दानी खेळांचा थरार

उभ्या महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारिक पद्धतीने मर्दानी दसऱ्याचं आयोजन करण्यात येतं.

20 October 2018 at 15:35