कण्हेर : भाजप युवा मोर्चा अनुसूचित जाती जमाती जिल्हा सातारा जिल्हाध्यक्षपदी उद्योजक रमेश अनिल उबाळे यांची नुकतीच निवड झाली.
रमेश उबाळे यांचे मुळ गाव ल्हासुर्णे ता. कोरेगाव येथील असून बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. याबरोबरच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे, गरजुंना मदत करणे, होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे, सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळून देणे, आदी उपक्रमांमुळे त्यांचा समजातील अनेक घटकांशी निकटचा संबध आहे. या कार्याची दखल भाजपच्या युवा मोर्चा अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड केली असून नुकतेच त्यांना जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना उबाळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या साडे तीन वर्षात भ्रष्टाचारमुक्त कारभार केला आहे. हा पक्ष जनतेचे प्रश्न सोडवू शकतो हा विश्वास निर्माण झाल्याने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पक्षानेही अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन सन्मान केल्याबद्दल ऋणी आहोत. वाडी-वस्तीवर जाऊन आपण पक्षाचा विचार पोहचवून मागासवर्गीय कार्यकर्त्यांची फळी उभी करणार आहे.
यावेळी उबाळे यांचे अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जि. प. सदस्य महेश शिंदे, मनोज घोरपडे, संदीप शिंदे, जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत, जिल्हा युवक अध्यक्ष निलेश नलवडे, अ. जा. आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद काकडे, कोरेगाव शहराध्यक्ष राहुल बर्गे, अप्पा कदम, गणेश पालके यांनी अभिनंदन केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |