तनया जन्मत: अपंग होती. तोंडांचा जबडा, मान, खांदे, कोपर, मनगट, गुडघे, कंबर, बोटे शरीरातील 80 टक्के हांडांचे सांधे जखडलेले होते. पाठीचा मणका कणा वाकलेला होता. त्यामुळे हालचालीवर मर्यादा येत होत्या. जास्तीत जास्त आठ-दहा दिवस जगेल. डॉक्टर बोलले. मग दररोज सकाळी तिने डोळे उघडले की तो दिवस तिचा शेवटचा दिवस समजून तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाले. महिना झाला मग प्रत्येक महिन्यात 22 तारखेला तिचा वाढदिवस साजरा करत गेलो. एक वर्षांनी ती बसू लागली. तिला बोललेल समजत होते, पण तोंडाच्या हालचाली करता येत नव्हत्या. तिला दात आले. मग तिला हळू हळू बोलता येऊ लागले. गुडघे आणि कंबर सरळ होत नसल्याने तिला उभे राहता येत नव्हते. दररोज कम्प्युटरवर तिच्या आवडीची बालगीते कार्टून बघत असे. अडीच वर्षांची झाली तेव्हा तिला कम्प्युटरचा किबोर्ड पाठ झालेला होता. चार वर्षाची झाली, एका खाजगी नर्सरी प्रीस्कूलमध्ये तिला टाकले. तिथे कमी बोलत असे. पण वर्गात बोललेल तिला पक्के लक्षात असायचे. तीक्ष्ण स्मरणशक्ति होती. शाळेतल्या सार्या 60-70 मुलांची नावे आडनावे पाठ होती. नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजी झाल्यावर सात वर्षे पूर्ण झाल्यावर प्राथमिक शाळेत घालण्याचे ठरवले. अपंग असल्यामुळे जवळपासच्या शाळेत जबाबदारी टाळत होते. प्रवेश देत नव्हते. कोठारी कन्या शाळा जेलरोड नाशिकरोड यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश दिला. पंधरा दिवस तिची अभ्यासातली प्रगति पाहून त्यांनी तिला इयत्ता दुसरीच्या वर्गात बसवले. शाळेत दररोज सकाळी साडेसात वाजता वर्गात बेंचवर नेऊन बसवावे लागत असे. जास्त वेळ बसल्याने तिची पाठ कंबर दुखत असल्याने तिला मधल्या सुट्टीत दहा वाजता तिला घरी घेऊन येत असे. तरीही शाळेत अभ्यासात पहिला नंबर कधी सोडला नाही. दोन्ही हाताची बोटे वाकडी असल्याने तिला जास्त लिहिता येत नसे. पण चित्रे सुंदर काढत असे. इयत्ता तिसरीत असताना दैनिक सकाळ बालचित्रकला स्पर्धेत तिने सर्वसामान्य गटात उत्तेजनार्थ परितोषिक मिळाले होते.
कम्प्युटरला इंटरनेटवर ऑनलाइन व्हिडिओ, कार्टून, गेम खेळत असे. फेसबुकवर फार्मविले सारखे ऑनलाइन गेम खेळण्यासाठी हट्ट करून स्वत:चे प्रोफाइल काढून मागितले.
तिच्या बरोबरचे वयाचे चुलत-मावस भावंडे, शाळेतली मुले बाहेर मैदानात खेळत असत. त्यामुळे ती रेखा चित्रे, रंग, कागद कात्री हस्तकलेत स्वत:ला गुंतवून घेतले. तिच्या चित्रात एकच मुलगा-मुलगी काढत असे. तिला बोललो चित्रामध्ये आणखी मुले मुली का काढत नाहीस? त्यावर ती बोलली, ते मुले थोडावेळ माझ्यासोबत खेळतात, मग सारे घराबाहेर खेळायला जातात. मी घरात एकटीच असते. मी एकटीचेच चित्र काढत असते. बोलण्यात खूप पटाईत हजरजबाबी होती. मोबाइलमध्ये सुडोकू अंक गणिताचा गेमच्या 60-70 लेव्हल एका तासात पार करत असे. शाळेत तिला खूप मैत्रिणी होत्या. सारेजण तिला नावाने ओळखत असत. टीव्हीवर डोरेमन, ओगी & कोंकरेजेस, हॅरी पॉटर तिला खूप आवडत असत.
थंडी, उन्हाळा पावसाळ्यात बदलत्या हवामानात तिची नाजुक तब्बेत नेहमीच बिघडत असे. इयत्ता चौथीत असतांना (नऊ वर्षे 4 महीने) साधे सर्दी पडसेचे निमित्त झाले. तब्बेत खालावून हसत खेळत असतांना अचानक गेली.
आता फक्त आठवणी उरल्यात.
तनया (भूमी) जयंत जोपळे,
मंगळवार दि.22 एप्रिल 2003 - सोमवार दि.10 सप्टेंबर 2012
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |