01:24am | Mar 11, 2019 |
कराड : मोबाईलवर संपर्क साधून पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने निवृत्त शिक्षकाकडून 14 लाख रूपये उकळून फसवणूक करणार्या तीन संशयीतांना कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दिल्लीतून ताब्यात घेऊन अटक केली. तिघांना रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.
प्रदीपकुमार वीरसिंह (वय 24), अक्षय कुमार सुनील कुमार (वय 24) आणि सिकंदर सिंह सिरोहा, अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निवृत्त शिक्षक संभाजी ज्ञानदेव दाभोळे (वय 62, मूळ रा. साळशिरंबे, ता. कराड, सध्या रा. आगाशिवनगर-मलकापूर) यांच्या मोबाईलवर संपर्क साधला साधून टाटा एआयजी कंपनीच्या पॉलिसीचे पैसे मिळवून देतो. तसेच विमा करून देण्यासाठी संशयीतांनी ठराविक रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार दाभोळे यांनी संशयीतांच्या सांगण्यानुसार वेळावेळी वेगवेगळ्या खात्यावर एकूण 14 लाख 24 हजार रूपये भरले होते. मात्र, तरीही वेगवेगळी कारणे सांगून संशयीत दाभोळे यांना आणखी पैसे भरण्यास सांगत होते. त्यामुळे वैतागून त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती.
फिर्यादीच्या अनुषंगाने तपास करताना तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी सातारा सायबर सेलच्या मदतीने संशयीत निष्पन्न केले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सपोनि माळी व पोलिसांचे पथक दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन एका संशयीतास राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. तिन्ही संशयीतांनी पैसे उकळून फसवणूक केल्याची कबुली दिली. दिल्लीतील न्यायालयातून तिघांचे ट्रांझिट रिमांड घेऊन पोलीस पथक शनिवारी रात्री कराडात पोहोचले. रविवारी सायंकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |