03:36pm | Nov 17, 2019 |
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या आणि भाविकांसह निर्जन ठिकाणी वावरणार्या प्रेमी युगुलांवर जीवघेणे हल्ले करून लुटणार्या कुख्यात ‘आप्पा- मान्या’च्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत शुक्रवारी कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रस्तावाला पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी सायंकाळी मंजुरी दिली. दरम्यान मोक्का कारवाईमध्ये सातारा जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
मोका अंतर्गत कारवाई झालेल्यात टोळीचा म्होरक्या आप्पा ऊर्फ सुभाष नामदेव माने (रा. तामशिडवाडा, ता. माळशिरस, सोलापूर), सचिन बलभीम कारंडे (रा. गुप्तलिंग रोड, शिखर शिंगणापूर, ता. माण, सातारा), शहाजी बबन लोखंडे (शिखर शिंगणापूर, सातारा), दादासाहेब तात्याबा कडोलकर (मारकरवाडी, सदाशिवनगर, ता. माळशिरस, सोलापूर) या सराईताचा समावेश आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांसह कर्नाटकातही प्रचंड दहशत निर्माण केलेल्या टोळीतील साथीदाराविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात मृत्यू अथवा जबर दुखापत करण्याच्या प्रयत्नासह जबरी चोरी, खंडणी वसुली, अपहरण, फौजदारी पात्र गुन्ह्याचा कट रचण्याचे वीसहून अधिक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातही टोळीतील साथीदारांनी गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घातला होता. जोतिबा, पन्हाळ्यासह विविध ठिकाणी भाविकांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटणे, निर्जनस्थळी वावरणार्या प्रेमी युगुलांवर जीवघेणे हल्ले करून लुटले होते. कोडोली पोलिस ठाण्याच्या चौकशीत अनेक गंभीर गुन्हे उघडकीला आले होते. शाहूवाडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल कदम व कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे यांनी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांच्याकडे सादर केला होता. या कारवाईमुळे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारी वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |