वाई : येथील दत्त नगरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सुहास उर्फ राम जनार्दन इथापे ( वय ४८ ) याचा भरधाव मारूती कारने पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने डोळ्याला गंभीर दुखापत होवुन जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पसरणी घाटात रेशीम केद्रांजवळ घडली. कारचालकांने दारूच्या नशेत हे कृत्य केले असुन तो स्वतः हुन वाई पोलिस ठाण्यात हजर झाल्यावर पोलीसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल चतुर्थीचे मालक राम कदम हे नेहमीप्रमाणे सायंकाळी पसरणी घाटात चालण्यासाठी गेले होते. रेशीम केंद्राजवळ पोहचले असता पाठीमागुन भरधाव वेगात आलेल्या मारूती कारने (क्र. एम. एम. १४ एक्स ६३८३ ) पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यु झाला. मंद्यधुंद अवस्थेत असलेला कार चालक विजय सुभाष गोळे ( वय ) हा अपघातानंतर तिथुन आपल्या पत्नी सोबत पळुन गेला. राम इथापे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषीत केलं.
दुसरीकडे पोलिस कारचालकाचा शोध घेत होते. एक तासानंतर चालक हा मद्यधुंद अवस्थेत पत्नी सोबत स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या गुन्हा दाखल केला आहे.
राम इथापे हे मृत झाल्याची माहिती समजतात दत्तनगर व वाईतील त्याचे मित्र मोठ्या संख्येने दवाखान्याबाहेर उभे होते. मनमिळावू व हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या राम इथापे हे वाई सुपरिचित होते. त्यानी भागीदारीत हॉटेल व्यावसाय सुरू केला होता. ते रोज पसरणी घाटात चालायला जात असत. त्याच्या पश्चात वडील, पत्नी , दोन मुलं व बहिण भाऊ असा परिवार आहे. शनिवारी कृष्णातीरी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |