सातारा : गर्भपाताच्या बेकायदेशीर औषधाबाबत संशयितांना तालुका पोलिस जाणूनबुजून अटक करत नसून कारवाईवेळी संशयितांना अन्न व औषध विभागाने ताब्यात घेतले होते मात्र तालुका पोलिसांनी त्यांना सोडून दिले असल्याचा गंभीर आरोप ऍड.वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. सातार्यात ठिकठिकाणी गर्भपाताची औषध विक्रीचे अड्डे आहेत. दरम्यान, गर्भपात औषध विक्रीमध्ये मोठ्या साखळीचा समावेश असून तत्काळ या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
दलित महिला विकास मंडळ अंतर्गत लेक लाडकी अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे पुढे म्हणाल्या, सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बेकायदा गर्भपात औषधांचा साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अन्न व औषध विभागाने कारवाई केल्यानंतर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल न करता टाळाटाळ केली. पोलिसांनी केलेले हे कृत्य गंभीर असून संशयितांना अन्न व औषध विभागाने ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नाही. यामुळे दरम्यानच्या काळात संशयितांनी पुरावे नष्ट करण्याचा निश्चित प्रयत्न केला असण्याची शक्यता असल्याचा आरोप ऍड. वर्षा देशपांडे यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, हिरापूरमध्ये ज्या ठिकाणी बेकायदा गर्भपात करण्याची औषधे सापडली आहेत तशीच ठिकाणी सातार्यातील मंगळवार तळे, शाहूपुरी या परिसरात असून अशी ठिकाणी तत्काळ सील करावीत. या प्रकरणामध्ये सातार्यातील अनेक डॉक्टर या पध्दतीच्या औषधाच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीमध्ये गुंतले असण्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, सातारा तालुका पोलिस ठाणे हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळण्याची शक्यता नसल्याने या घटनेचा तपास एलसीबीकडे वर्ग करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्यासह समन्वय साधून वैद्यकीय गर्भपाताच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे का? याबाबत त्वरीत आशा वर्कर मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही ऍड.वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दोषींवर कठोर कारवाईची मेडीकल असोसिएशनची मागणी
गर्भपाताची औषधे सातारानजीक सापडल्यानंतर हे प्रकरण गंभीर बनले आहे. सातरा केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने एक प्रसिध्दीपत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, विनापरवाना काही लोक औषधांचा साठा व विक्री करत आहेत. ही बाब गंभीर असून अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी हे रॅकेट चालवणार्यांचा पर्दाफाश करावा. असोसिएशन गैरकृत्य करणार्यांच्या पाठीशी नसून दोषी असणार्यांवर कडक कारवाई करावी. तपास यंत्रणेसाठी जी काही मदत लागेल ती दिली जाईल, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |