श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. अर्निया आणि सांबा सेक्टरनंतर आता आरएसपुरा सेक्टरला पाकिस्तानी सैन्यानं लक्ष्य केलं. आज सकाळपासून गोळीबार करण्यात येत असून, त्यात आतापर्यंत चार नागरिक ठार झाले आहेत.
कठुआ जिल्ह्यातील हिरानगरमध्ये आज सकाळी सीमेपलिकडून गोळीबार करण्यात आला. त्यात लोंदी परिसरातील नागरिक राम पॉल जखमी झाले. त्यांना जम्मूतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार सुरूच असून, त्यात आतापर्यंत चार नागरिक ठार झाले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून हिरानगर, सांबा, रामगढ, अर्निया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत असून, उखळी तोफांचा माराही करण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी आरएसपुरा, अर्निया आणि सांबा सेक्टरमध्ये आणखी काही बुलेटप्रुफ वाहने पाठवली आहेत. दरम्यान, गोळीबारामुळं जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील सीमारेषेजवळील गावांमधील ४० हजारांहून अधिक लोक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |