03:22pm | Mar 09, 2019 |
इस्लामाबाद : पाकिस्तानात सत्तेवर राहिलेल्या मागील सरकारांनी पाकिस्तानात दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिले, असा स्पष्ट आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. या आरोपाद्वारे दहशतवादाशी आपला काही संबंध नसल्याचे सतत सांगत आलेल्या पाकिस्तानला पंतप्रधान इम्रान खान यांनीच खोटे पाडत पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय असल्याची कबुलीच दिली आहे. आपले सरकार पाकिस्तानात यापुढे कधीही दहशतवादी संघटनांना काम करू देणार नाही, अशी भूमिका घेत पंतप्रधान खान यांनी दहशतवादविरोधी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधमधील थारपारकर जिल्ह्यात आयोजित एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान खान यांनी हे वक्तव्य केले आहे.
पूर्वीच्या सरकारांनी केव्हाही दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 'तहरीक-ए-इन्साफ' पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही नॅशनल अॅक्शन प्लानवर गांभिर्याने विचार करत आहोत असे पंतप्रधान खान म्हणाले. या धोरणांतर्गत दहशतवाद आणि अतिरेकीपणा नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
पुलवामा दहशतवादी हल्ला 'जैश-ए-मोहम्मद'ने घडवल्याचे उघड झाल्यानंतर या संघटनेवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढत आहे. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहर भारतीय संसदेवरील हल्ला, तसेच पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |