08:59pm | Mar 27, 2020 |
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नव्या घंटागाडीच्या पूजनाचा आरोग्य विभागाने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला. मात्र या व्यवस्थेत सफाई मोहिमेची घडी विस्कटल्याने सातारा शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग दिसून आले.
सातार्यात कोरोनाच्या संसर्गाची युध्द सदृश्य परिस्थिती असताना शहरात कचरा उचलला न गेल्याने आरोग्य विभागाच्या सफाई मोहिमेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुरुवार परज, सातारा तालुका पोलीस स्टेशन कॉर्नर, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, बारटक्के चौक, जुना मोटार स्टँन्ड परिसर लक्ष्मी टेकडी (सदर बझार) इ. ठिकाणी कचरा उचलला न गेल्याने कोरोनाचे सातार्यात दहशतयुक्त वातावरण असताना शहर शुक्रवारी बकाल दिसत होते. गुरूवारी संध्याकाळी बारटक्के चौकात सगळा कचरा रस्त्यावर येऊन त्यामध्ये डुकरे निवांत लोळत होती तर भटक्या जनावरांसह कुत्र्यांची गर्दी झाली होती. गुरूवार परज व सदाशिव पेठेमध्ये रात्री नऊनंतर कचरा मात्र रस्त्यावर टाकला जात आहे. पोवई नाका, राजवाडा, सदाशिव पेठ भाजी मंडईतही कितीही शिस्तीचा बडगा उगारला तरी शिल्लक भाजीपाला रस्त्यावर टाकून निघून जाण्याची सवय ना शेतकर्यांची गेली ना व्यापार्यांची.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पालिकेच्या नव्या घंटागाडयांचे गुढीपाडव्यांचे झटपट पाहणी करून पूजन करण्यात आले. मात्र या व्यस्ततेत सफाई मोहिमेच्या वेळांचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी साडेसात वाजता पहिली फेरी त्यानंतर दोन फेर्या असे एक ते वीस प्रभागाचे नियोजन दोन ठेकेदारांना वाटून देण्यात आले आहे. 1 ते 15 प्रभाग एका कडे व 15 ते 20 प्रभाग एका कडे असे नियोजन आहे. यापूर्वी शहराच्या पश्चिम भागाची सफाई मोहिम अमित शिंदे यांच्या यशश्री एंटरप्रायजेसला देण्यात आली होती मात्र ती सेवा 24 मार्च रोजी संपली आणि 26 मार्च पासून पालिकेच्या घंटागाडयांची थेट सेवा सुरू झाली. चालक व सहाय्यक सेवा ही ठेकेदाराची जवाबदारी आहे. सफाई मोहिमेचे रूटीन अद्याप न बसल्याने कचरा उचलण्यात थोडी अडचणं झाली. मात्र येत्या दोन दिवसात ही सेवा सुरळीत होईल, अशी हमी घंटागाडी ठेकेदारांनी दिली. शहरातील कचर्यांची सचित्र ठिकाणे मुख्याधिकार्यांकडे पोहचल्यानंतर आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली. गुरूवार परज, राधिका रोड, बाजार समिती येथील कचरा उचलण्यासाठी चार सफाई कर्मचारी व ट्रॅक्टर तातडीने पाठवण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |