05:44pm | Mar 02, 2018 |
सातारा : मराठी भाषेला आभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्हयाने चळवळ उभी केली आहे त्यामुळे त्या शिष्टमंडळात सातारा जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बडोदे येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटेल असे जाहीर केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर शिष्टमंडळ भेटणार असल्याचे प्रसिध्द झाले होते. तथापि हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सातारा जिल्हयाने पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जाचा चार वर्षे धूळ खात पडलेला प्रस्ताव कॅबिनेट नोटपर्यंत नेण्यासाठी जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींनी वारंवार निवेदने, पंतप्रधाना कार्यालयाशी पत्रव्यवहार, दिल्लीत आंदोलन केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळात जिल्हयातील साहित्यिक प्रतिनिधींचा समावेश करु. तसेच लवकरच शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जाईल अशी ग्वाही दिली.
या चर्चेवेळी मसाप जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, कविवर्य बा.सी.मर्ढेकर स्मारक समिती सदस्य हरिष पाटणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पालिका भाजप गटनेते धनंजय जांभळे, नगरसेवक विजय काटवटे, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अॅड. विक्रम पवार, फिरोज पठाण उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |