सातारा : सातारारोड, ता. कोरेगाव येथील मनोज नाथा पानस्कर हा सातारारोड येथील एका महिलेला गेल्या 7 ते 8 वर्षांपासून मानसिक त्रास देवून छळ करीत असून अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून त्या पीडित महिलेने जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांना याबाबतचे निवेदन दिले असून मनोज पानस्कर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, मनोज पानस्कर हा विकृत असून सातारारोडमधील अनेक अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग व छळ केल्याचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच पानस्कर बंधूंना पाठबळ देणार्या दीडशहाण्या ‘सय्यद’वरही कठोर कारवाईची मागणी सातारारोड येथील पीडित महिलांनी केली आहे.
मनोज नाथा पानस्कर, त्याचा भाऊ व दीड शहाण्या सय्यदने गेल्या काही वर्षांपासून सातारारोडमध्ये उच्छाद मांडलेला आहे. विवाहित महिला, अल्पवयीन शाळकरी मुलींना टार्गेट करुन हे दोघे भाऊ त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या महिलेने यांना विरोध केला तर तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटूंबाला मारहाण करुन उलट त्यांच्यावरच गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे सातारारोडमधील एकही महिला अथवा अल्पवयीन मुलगी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास धजावत नाही. सातारारोड पोलीस दूरक्षेत्रातील एक पोलीस कर्मचारी या दोघा पानस्कर बंधूंना नियमितपणे पाठिशी घालत असतो. त्यामुळे या दोघा भावांची डेअरिंग सातारारोडमध्ये भलतेच वाढलेले आहे. काही महिन्यांपूर्वी मनोज पानस्कर याने दहावीत शिकणार्या एका अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग केला होता. भेदरलेल्या मुलीने हा सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितल्यानंतर संबंधित पालक जाब विचारण्यासाठी पानस्कर यांच्या घरी गेले असता पानस्कर बंधूंनीच या पालकांना मारहाण करुन उलट त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले होते. भ्रष्ट पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची मात्र साधी तक्रारही दाखल करुन घ्यायला टाळाटाळ केली होती. परंतू तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची संबंधित मुली व तिच्या पालकांनी भेट घेवून आपबिती सांगितल्यावर संदीप पाटील यांनी त्या नराधमावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात थेट पोलीस अधीक्षकांनाच हस्तक्षेप करावा लागल्याने कोरेगाव पोलीस किती भ्रष्ट आहेत, याचा अंदाज येवू शकतो. पानस्कर बंधूंना पोलिसांनी पाठीशी घातल्यामुळेच सातारारोडमधील महिलांना आज मुक्तपणे फिरता येत नाही. त्यामुळे सातारारोडमधील एका पीडित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निवेदन देवून मनोज पानस्कर सह त्याच्या भावावर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे.
सातारारोड 'ओपी' बरखास्त करण्याची मागणी
सातारारोडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पानस्कर बंधू महिलांचा तसेच अल्पवयीन मुलींचा छळ करीत आहेत. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी सातारा ओ पी मध्ये येत असतात. परंतू सातारारोडमधील एक पोलीस कर्मचारी या पानस्कर बंधूंना पाठिशी घालण्याचे काम करतो, तसेच पीडितांवरच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करतो. त्यामुळे अनेक पीडित महिला सातारा ओ पी मध्ये तक्रार द्यायला जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे ज्याठिकाणी तक्रार दाखलच करुन घेतली जात नाही, अशी ओ पी पाहिजेच कशाला? असा प्रश्न पीडित महिलांनी केला असून बिनकामाची सातारारोड ओ पी बरखास्त करण्याची मागणी पीडित महिलांनी केली आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |