03:45pm | Aug 18, 2018 |
सातारा : जिल्ह्यातील अवैध खाजगी सावकारीचे हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यात काल शुक्रवार दि. 17 रोजीच्या रात्री जिंती-खुंटे रोडवर जिंती, ता. फलटण येथे विनोद भोसले यांनी अवैध खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्त्या केल्यामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान होळ, ता. फलटण येथील ग्रामस्थांनी साखरवाडी दूरक्षेत्रासह फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याला घेराव घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फलटण तालुका अवैध खाजगी सावकारीच्या बाबतीत जिल्ह्यामध्ये कुप्रसिद्ध आहे. येथील राजकीय पुढार्यांच्या जोरावर खाजगी सावकार गब्बर झालेले आहेत. होळ, ता. फलटण येथील विद्यमान उप सरपंच विनोद बबन भोसले (वय 40) यांनी अवैध खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून काल शुक्रवार दि. 17 रोजी जिंती गावच्या हद्दीमध्ये गळफास घेवून आत्महत्त्या केली असल्याचे आज सकाळी उघडकीस आले. फलटण ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांना मृताच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये मृताने फलटणमधील सुमारे 5 खासगी अवैधा सावकारांची नावे लिहिली आहेत. दरम्यान, त्या सुसाईड नोटमध्ये मी खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याची नोंद केली आहे. होळ येथील विद्यमान उप सरपंच विनोद बबन भोसले यांनी खासगी सावकारीला कंटाळून आत्महत्त्या केली असल्याचे समजताच साखरवाडी होळ परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी फलटणकडे धाव घेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला घेराव घालत संशयित आरोपींच्या अटकेची मागणी केली. यावेळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी आरोपींना तत्काळ अटक केली जाईल, तसेच सुसाईड नोटच्या आधारे संशयित आरोपींवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |