02:09am | Oct 12, 2018 |
कराड : शेती व्यवसाय मुळातच अडचणीत आल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतकरी बांधवांना अंदाजे भरमसाट बिले आकारून लुटण्याचा धंदा वीज वितरण कंपनीने तात्काळ थांबवावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असहकार आंदोलन पुकारून आसुड मोर्चा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने वीज वितरण कंपनीला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कराड येथील दत्त चौकातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात याबाबतचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी यांनी दिले. यावेळी युवा तालुकाध्यक्ष विक्रम थोरात, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे विजय पाटील उत्तम खबाले, विशाल कसबे, सचिन देसाई, रुपेश पवार, रणजीत पाटील, सुहास पाटील, शिवाजीराव पाटील, अजय पाटील, लक्ष्मण छत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शेतकर्याकडून 24 तास वीजपुरवठा करण्याचे बिल आकारले जाते, प्रत्यक्षात मात्र आठ तास वीजपुरवठा केला जातो. मुळात विविध कारणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. यात भर म्हणून वीज वितरण कंपनीकडून प्रत्यक्षात रीडिंग न घेता अंदाजे विज बिल कर आकारून भरमसाट प्रमाणात शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे परिसरातील शेतकर्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वीज कंपनीच्या अधिकार्यांनी यात तात्काळ लक्ष घालून अंदाजे करण्यात आलेली वीज बिले कमी करण्यात यावी. असे न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असहकार आंदोलन करण्यात येईल. याशिवाय वीज मंडळाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी वीज कंपनीच्या बेजबाबदार अधिकार्यांचीच असेल असे या निवेदनात म्हटले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |