कोरेगाव : कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी धनाजी एकनाथ चव्हाण (वय 36, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव) हा सोमवारी दुपारी 12.45 च्या सुमारास शांतीनगर परिसरात मोटारसायकलवरून उडी टाकून पसार झाला. चव्हाण याला न्यायालयात हजर करायचे असल्याने तत्पूर्वीच्या वैद्यकीय तपासणीसाठी
मोटारसायकलवरून नेताना त्याने हे कृत्य केले. त्याचा पाठलाग करताना पोलिस नाईक महादेव आळंदे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रुई, ता. कोरेगाव येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भांडणातून तलवार हल्ला झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी म्हणून धनाजी एकनाथ चव्हाण याला अटक केली होती. सोमवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला हजर करायचे असल्याने वैद्यकीय तपासणी करणे नियमानुसार बंधनकारक होते. त्यामुळे गार्ड ड्युटीतील पोलिस नाईक महादेव आळंदे यांना चव्हाण याची वैद्यकीय तपासणी करून आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दुपारी 12.30 च्या सुमारास आळंदे यांनी चव्हाण यास ताब्यात घेतले. पोलिस ठाण्याची जीप ही अगोदरच इतर महिला आरोपी घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्याने, ती परतण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आळंदे यांनी चव्हाण याला बेड्या न घालता मोटारसायकलवर पाठीमागे बसवले आणि रहिमतपूर रस्त्याने ग्रामीण रुग्णालयाकडे निघाले. शांतीनगर येथे अजिंक्यनगर कॉलनीच्या रस्त्याजवळ चव्हाण याने मोटारसायकलवर चुळबुळ सुरू केली. त्यामुळे आळंदे यांनी मोटारसायकलीचा वेग कमी केला. तेवढ्यात चव्हाण याने उडी मारली आणि पळ काढला.
आळंदे यांनी मोटारसायकल उभी करून त्याचा पाठलाग केला; मात्र तो परिसरातील शेताकडे पळत सुटला. आळंदे हे शेतातून पळत असताना, बांधावर तोल गेल्याने ते पडले आणि जखमी झाले. अशा अवस्थेत त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. आळंदे यांना अचानक घाम येऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
हा प्रकार समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह उपनिरीक्षक बळीराम सांगळे, संतोष मिसळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी व अन्य कर्मचार्यांनी शोध मोहीम राबवली, मात्र चव्हाण हाती लागला नाही. अखेरीस पोलीस नाईक महादेव आळंदे यांनी ग्रामीण रुग्णालयातून फिर्याद दिली. त्याआधारे धनाजी चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |