RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

सातार्‍यात श्री गणराय विसर्जन मार्गाची भर उन्हात पोलीस यंत्रणेकडून पाहणी

13 September 2018 at 18:10

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत यंदा प्रथमच श्रींच्या विसर्जन तलावाच्या प्रश्‍नामुळे नगरपालिका हतबल झाली आहे. भाविकांच्या चेहर्‍यावर चिंता असताना व सातारा नगरपालिकाच विसर्जित करण्याची वेळ आली आहे. अशावेळी सातारा पोलीस यंत्रणेने भर उन्हात सातार्‍यातील तलाव, कृत्रिम तळे मार्गावरील पाहणी करुन श्री गणराय भक्तांना दिलासा दिलेला आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेनेच खर्‍या अर्थाने भक्तांसाठी विघ्नहर्ता भूमिका घेतली आहे.

राजवाडा येथे सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक विजय पवार, उप अधीक्षक गजानन राजमाने, पोनि नारायण सारंगकर, वाहतूक शाखेचे पोनि सुरेश घाडगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शरद काटकर यांनी प्राथमिक चर्चा करुन संपूर्ण सातारा शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मार्गाची पाहणी करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार समर्थ मंदिर, बोगदा, शाहू उद्यान, डॉ. आंबेडकर चौक, गोडोली तळे, कल्याणी शाळा, दगडी शाळा, हुतात्मा स्मारक येथील संभाव्य कृत्रिम तळे व नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावाची पाहणी केली. तसेच मोठ्या गणरायांच्या मूर्तीसाठी कण्हेर येथील जलसागर तलाव निश्‍चित होणार असल्याने त्यादृष्टिनेही सध्या चर्चा होत आहे. पोवई नाक्यावरील भागात असणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी तातडीने ग्रेड सेपरेटरच्या एका भागाचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतू पाडव्यापासून गेली तीन महिने याठिकाणच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी, लघु व्यवसायिक यांचे तब्बल लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे आता विसर्जन तळ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीच आता पुढाकार घेतला आहे. त्यामुळे हा विसर्जनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी शहराच्या नजिक असलेल्या पोहण्याचा तलाव, कृत्रिम तळे व कण्हेर धरणानजिकचा जलसागर तलाव व माहुलीतील कृष्णा नदीच्या पात्रात देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर खर्‍या अर्थाने श्री गणरायाला आनंदाने निरोप मिळणार आहे. 

घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जन मार्गावरील अनाधिकृत टपर्‍या, फेरीवाले यांना हटविण्यात येणार आहे. सातारा शहरात 70 सार्वजनिक गणेश मंडळे व 80 हजार घरगुती गणरायाचे विसर्जन करताना डॉल्बी बंदी ही कायम करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी श्री गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला श्री गणरायाच्या मूर्तीची उंची कमी करण्याची सूचना माहिती कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आली. तत्पुर्वीच अनेक उंच असलेल्या मूर्ती मंडपामध्ये दाखल झाल्याही होत्या. ही बाब अनेकांना खटकली असली तरी विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करेल, याची सातारकरांना खात्री आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून पोलीस यंत्रणेने विसर्जनाच्या दहा दिवसांपूर्वीच विसर्जन मार्ग व तळ्याची पाहणी केली आहे. याबाबत कायदा व सुव्यवस्था याला प्राधान्य देण्यात आले असून सातार्‍यातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. सातारा शहर हे पुरोगामी आहे. अनेक विचारवंत सातार्‍यात आहेत. त्यांनी वर्षभर प्रबोधन केले आहे, पण सध्या सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांच्या प्रबोधनाची खरी गरज आहे.मिस्टर रामराजे साहेब...तुमच्याकडे भीक मागायची वेळ कधीच येणार नाही

माण खटाव मतदारसंघात गेली दहा वर्षे स्वखर्चातून जनतेच्या प्रेमाखातर कोट्यावधी रूपयांची विकासकामांबरोबरच टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांना अखंडपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.

8 hours before

प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; परवा जिल्ह्यातील २५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात मंगळवारी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्त गेले तीन आठवडे चालू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आली.

9 hours before

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रोल रुमला निरीक्षकांची दिली भेट

वेब कास्टींग व जीपीएस कंट्रेला रुमला आज निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा, खर्च पडताळणी निरीक्षक अल्पेश परमार, पोलीस विभागाकडील निरीक्षक सुरीदरकुमार कालीया यांनी भेट दिली.

10 hours before

माथाडींच्या घर घोटाळ्यातील दहशतीचे आधी उत्तर द्या

माथाडी कामगारांसाठी नवी मुंबई येथे असलेली राखीव घरे अपात्र लोकांना मिळवून देण्याचे आमिष दाखवून, 104 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

10 hours before