RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

धरणे भरली पण गतवर्षीपेक्षा १२ टीएमसी साठा कमी

11 October 2018 at 19:30

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी धुवाँधार पाऊस बरसल्याने वेळेत धरणे भरली. तर दुसरीकडे नियोजनानुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. मात्र, सप्टेंबर महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारल्याने पाणीपातळी वाढली नाही. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा प्रमुख सहा धरणात १२ टीएमसीने साठा कमी आहे. सध्या या सहा धरणांमध्ये १३४ तर गतवर्षी १४६.२४ टीएमसी इतका साठा होता.

सातारा जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या प्रारंभी पावसाने सुरूवात केली. पूर्व भागासह पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील पेरणी वेळेत झाली. मात्र, पश्चिम भाग वगळता पूर्व भागात अपवाद वगळता पाऊस झालाच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडले. याचा सर्वाधिक फटका माण तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. शेतकºयांच्या पदरी कमी उत्पादन आले. तर पश्चिम भागात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात धुवाँधार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेसह, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आदी धरणे वेळेत भरली. त्यातच सतत पाऊस असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. असे असलेतरी सध्या मात्र, या धरणात पाणीसाठा कमी आहे. याला कारण म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.

कारंडवाडीत आकडा टाकून घरफोडी

कारंडवाडी ता.सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील उघड्या खिडकीतून आकडा टाकून पर्स लांबवली. या पर्समध्ये सोन्याचे गंठण होते.

7 hours before

उधारी मागितल्याने बियरची बाटली डोक्यात फोडली

पानपट्टीची उधारी मागितल्याने चिडून जावून पानटपरी चालकाच्या डोक्यात बियरची बाटली डोक्यात फोडून मारहाण करण्यात आली. ही घटना एमआयडीसी येथे घडली असून याप्रकरणी तिघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

7 hours before

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

सौ.धनश्री उमेश टकले (वय 41, रा.रविवार पेठ, सातारा) या विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती उमेश दत्तात्रय टकले व सासू विमल दत्तात्रय टकले (दोघे रा.शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

7 hours before

सुशांत अणवेकर यांची सायकल मोहिम आदर्शवत : आ. शिवेंद्रसिंहराजे

सुशांत अणवेकर यांनी दुर्गसंवर्धन आणि निसर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरुन ट्रान्स सह्याद्री ही 3 हजार किलोमीटर पेक्षाही जास्त अंतर प्रवासाची मोहिम हाती घेतली असून त्यांची ही सायकल मोहिम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्र

7 hours before