08:36pm | Oct 21, 2018 |
कराड : येथील नगरपालिकेनजीकच्या एका सभागृहात सुरू असलेल्या तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारून 30 जणांना ताब्यात घेतल्याची घटना शनिवारी (दि. 20) मध्यरात्री घडली. या छाप्यात 68 हजाराची रोकड, 21 मोबाईल आणि 9 मोटरसायकलींसह एकूण 5 लाख 810 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. प्रत्येकी दहा लोकांचे तीन गट करून पत्त्याचा जुगार तेथे खेळला जात होता. दरम्यान, अलिकडच्या काही वर्षात पत्त्याच्या जुगारावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
याबाबतची माहिती अशी, नगरपालिकेनजीकच्या एका सभागृहात तीन पानी पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना खबर्याकडून मिळाली. माहिती मिळताच ढवळे यांनी तातडीने विशेष पथकातील कर्मचार्यांना बोलावून घेऊन कारवाईची तयारी केली. मध्यरात्री 12 वाजता उपअधीक्षक ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने जुगार सुरू असलेल्या ठिकाणी छापा मारला. छापा पडताच जुगार खेळणार्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दहा-दहाचे तीन गट करून एकूण 30 जण तीन पानी पत्त्याचा जुगार खेळत होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच संशयितांकडून 68 हजाराची रोकड, 21 मोबाईल आणि 9 मोटरसायकली मिळून 5 लाख 810 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मयूर महादेव जाधव, रोहित महादेव जाधव, ऋषिकेश कुंडलिक कांबळे, अजित युवराज भोसले, राकेश गुलाब थोरवडे, जयदीप राजाराम कांबळे, उदय महादेव सातपुते (सर्व रा. बुधवार पेठ, कराड), अक्षय पांडुरंग मुळे, बिलाल फारूख कुरेशी, विनोद सुरेश कुंभार, कृष्णा तानाजी पाटील, अमोल रघुनाथ आमले, सोहिब शकिल बागवान (सर्व रा. रविवार पेठ, कराड), गफार रज्जाक सुतार, अब्दुल लतिफ अस्लम कुरेशी, आकाश विजय कांबळे, शाहरूख बशिर पटेल, अरूण सुभाष तेली (सर्व रा. गुरूवार पेठ, कराड), इरफान असिफ पठाण, शाहिद फारूख शेख, अशोक सुनिल रामुगडे, तौफिस अस्लम आत्तार (सर्व रा. मंगळवार पेठ, कराड), तौफिक इक्बाल मुजावर, पंकज हणमंत मुळे, बिलाल हारूण शेख (रा. शनिवार पेठ, कराड), अनिल दिलीप जाधव, लालसाब रशिद शेख (रा. कार्वेनाका, कराड), अनिल नारायण गायकवाड (रा. नगरपालिकेजवळ, कराड), रवींद्र जगन्नाथ वारे (रा. आगाशिवनगर-मलकापूर) आणि दर्शन दीपक शिंदे (रा. गजानन हौसिंग सोसायटी), अशी जुगार प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
उपअधीक्षक ढवळे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक कापसे, उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस नाईक प्रवीण पवार, सचिन साळुंखे, संतोष चव्हाण, हवालदार सागर बर्गे, दीपक कोळी, दीपक साठे, वाहन चालक घाडगे यांचा या कारवाईत सहभाग होता. रात्री 12 ते पहाटे 2 पर्यंत ही कारवाई सुरू होती. कारवाईवेळी जुगार खेळणार्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यात सापडलेली रोकड, महागडे मोबाईल आणि सभागृहाबाहेरील संशयितांच्या मोटरसायकली, असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे जुगार अड्डे चालविणार्यांसह जुगार खेळणार्यांचेही धाबे दणाणले आहेत. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे आणि पथकातील सर्व अधिकारी, कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |