कोलंबो : पहिल्या पराभवातून धडा घेत श्रीलंका महिला संघाने मालिकेतील दुसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात भारताला चांगला लढा दिला खरा; पण हातातील विजय हुकणार नाही, याची काळजी भारतीय गोलंदाजांनी घेतली. दुसरी वन-डे सात धावांनी जिंकून भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या महिलांनी ४८.१ षटकांत २१२ धावा केल्या. मालिकेतील तिसरी वन-डे १६ सप्टेंबरला खेळली जाणार आहे.
भारताची कॅप्टन मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. पूनम राऊत (३) आणि स्मृती मानधना (१४) यांना मोठी खेळी करता आली नाही. यानंतर हरमनप्रीत कौर (७) आणि दीप्ती शर्मालाही (१२) कॅप्टन मिताली राजला अधिक वेळ साथ देता आली नाही. या वेळी भारताची २२.३ षटकांत ४ बाद ६६ अशी स्थिती होती. यानंतर मितालीने तानिया भाटियासह भारताचा डाव सावरला. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. अर्धशतकानंतर मिताली बाद झाली. तिने १२१ चेंडूंत ४ चौकारांसह ५२ धावा केल्या. हे तिचे कारकिर्दीतील ५१वे अर्धशतक ठरले. श्रीलंकेविरुद्ध हे तिचे तिसरे अर्धशतक होते. भाटियाने ६६ चेंडूंत ९ चौकारांसह ६८ धावा केल्या. हेमलताने ३५ धावा जोडून भारताला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताचा डाव ५० षटकांत २१९ धावांत आटोपला.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची ३ बाद ४० अशी स्थिती होती. यानंतर चामरी अट्टापट्टू आणि सिरवर्धने यांनी डाव सावरला. अट्टापट्टूने ५७, तर सिरिवर्धनेने ४९ धावा केल्या. तळाच्या निलाक्षी डीसिल्वाने फटकेबाजी सुरू केल्याने श्रीलंकेला विजयाची आशा होती. मात्र, मानसी जोशीने तिला बाद करून भारताला मोठा दिलासा दिला. निलाक्षीने १९ चेडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३१ धावा केल्या. यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला २१२ धावांत रोखले.
संक्षिप्त धावफलक : भारत - ५० षटकांत सर्वबाद २१९ (मिताली राज ५२, तानिया भाटिया ६८, हेमलता ३५, शिखा पांडे १५, अट्टापट्टू ३-४२, प्रबोधनी २-४५, वीराकोडी २-३६) वि. वि. श्रीलंका - ४८.१ षटकांत सर्वबाद २१२ (अट्टापट्टू ५७, सिरवर्धने ४९, निलाक्षी डीसिल्वा ३१, मानसी जोशी २-४९, राजेश्वरी गायकवाड २-३७).
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |