RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

कोरेगावात अवैद्य वाळू सम्राटांना चाप

31 August 2018 at 23:20

चार ट्रॅक्टर-ट्रॉलीवर पोलीसांची धडक कारवाई; आठ जणांवर वाळू चोरीचे गुन्हे, चौघांना अटक

कोरेगाव: कोरेगाव तालुक्यातील शिरढोणगावच्या हद्दीतील वसना नदी पात्रामध्ये अनाधिकृतरित्या वाळूचे उत्खनन, बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणार्‍या चार ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रांताधिकारी किर्ती नलवडे आणि कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावच्या महसुल आणि पोलीस विभागाचे संयुक्त कारवाई करुन संबंधित वाळू तस्कारांच्यावर कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करुन प्रांताधिकार्‍यांनी सर्व मिळून सहा लाखाचा दंड ठोठावला. तर या वाळू तस्करी प्रकरणी कोरेगाव पोलीस स्टेशनने आठ जणांच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यापैकी चार आरोपींना तातडीने अटक केली. उर्वरीत चार आरोपींचा तपास सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरढोण (ता. कोरेगाव), गावच्या ‘शिखरेचे इनाम’ नावच्या शिवारात वसना नदीपात्रात 31 ऑगस्ट 2018 रोजी पहाटे 4.30 सुमास कोरेगावच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी कोरेगाव पोलीस कर्मचार्‍यांच्या सहकार्याने अनधिकृत वाळू उपसा करणार्‍या वाळू अड्डयावर आणि वाळू तस्करावर  धाड टाळली. आणि वाळूने भरलेल्या चार ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करुन ट्रॅक्टर ट्रॅालीसह एकूण 13 लाख 20 हजार रुपयेचा मुद्देमाल आणि चोरलेली वाळू ताब्यात घेतली.

या वाळू तस्करी, अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रांताधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांच्या सूचनेने पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी तानाजी फुलारे, रोहीत अडागळे, काशिनाथ पवार, रोहीदास फडतरे, संजय फडतरे, सुनील देंडे, सागर बर्गे, अक्षय बर्गे यांच्यावर वसना नदीपात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. या गुन्ह्यामध्ये तानाजी फुलारे, रोहीत अडागळे, काशिनाथ पवार, रोहीदास फडतरे यांना कोरेगाव पोलीसांनी तातडीने ताब्यात घेतले. उर्वरीत चार आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस आणि महसूल विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये महसुल विभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती किर्ती नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार, श्रीरंग मदने, अव्वल कारकुन अजित शेंडे, लिपीक दिपक देशमुख, मंडल अधिकारी किशोर धुमाळ, शिरढोण गावचे तलाठी विक्रम जाधव, वाहनचालक श्रीधर कांबळे, कोतवाल फिरोज मुलाणी सह कोरेगाव पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. शिरढोण गावच्या हद्दीतील वसना नदीपात्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर धडक कारवाई करुन चार ट्रॅक्टर-ट्रॉलीना 6 लाख रुपये दंड शासनाने ठोठावल्याने आणि त्या संबंधी गुन्हे दाखल केल्याने कोरेगाव शहर परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. 

 

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यात पोलिसांचे महासंचलन

उद्या होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातार्‍यातील मुख्य मार्गांवर हजारो पोलिसांनी महासंचलन केले. सातारा जिल्ह्यात मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था

21 hours before

सातार्‍यात आणि माढ्यात भूमिपुत्रांचाच डंका ?

तारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे श्री. छ. उदयनराजे भोसले हॅट्रीक करणार? की, माढा लोकसभा मतदारसंघातून फलटणचे भूमिपुत्र रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपचे कमळ फुलवणार?

21 hours before

श्री संतकृपा इंजिनिअरींगचा पुणे येथील विविध कंपन्यांशी सामजस्य करार

घोगांव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक) या महाविद्यालया मध्ये प्रवेश घेऊन बाहेर पडणार्‍या अभियंत्यांसाठी संस्था विविध संकल्पना राबवत असते.

23 hours before

आ.बाळासाहेब पाटील यांची पाडळी येथील पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

गांवोगांवी होणार्‍या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम

23 hours before