07:54pm | Feb 10, 2018 |
केप टाऊन : कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा उडवत वनडे मालिकेत विजयी हॅटट्रिक साधली. त्याबरोबरच सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अजेय आघाडीही घेतली. विराट कोहलीचे शतक आणि मोठ्या लक्ष्याच्या बचाव करताना गोलंदाजांनी केलेला भेदक मारा हे भारतीय संघाच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
तत्पूर्वी
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज खेळीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला निमंत्रित केल्यावर विराट कोहलीने केलेल्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 394 धावांचे आव्हान दिले होते.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराटने शिखर धवनच्या साथीने भारताचा डाव सावरला. त्याने धवनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली. विराटप्रमाणेच शिखर धवननेही आक्रमक फलंदाजी केली. मात्र तो 76 धावांवर बाद झाला.
शिखर धवन बाद झाल्यावर भारताच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ तग धरता आला नाही. अजिंक्य रहाणे (11), हार्दिक पांड्या (14), महेंद्र सिंग धोनी (10) आणि केदार जाधव (1) हे झटपट बाद झाले. मात्र एक बाजू लावून धरणाऱ्या विराटने छोट्या पण उपयुक्त भागीदाऱ्या रचत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. दरम्यान विराटने या मालिकेतील दुसरे आणि वनडे कारकिर्दीतील 34 वे शतक पूर्ण केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |