सातारा : सुमारे 400 वर्षापूर्वी युध्द कला आणि युध्दनीती कशी होती, तसेच शिवकालीन शस्त्रे व खेळ कोणते होते हे आज बहुतांशी व्यक्ती आणि युवकांना माहीती नाही. त्यामुळे राजधानी महोत्सवातील शिवजागर या कार्यक्रमामधुन शिंवकालीन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शन, व खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्याचा घेतलेला उपक्रम निश्चितच ऐतिहासिक काळात घेवून जाणारा आहे. किल्ले अजिंक्यतारा- सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी होती, आपल्या पूर्वजांनी गाजवलेल्या पराक्रमामधुन आणि जाज्वल्य इतिहासामधुन बोध घेवून, आधुनिक संगणकीय युगामध्ये युवकांनी शिवनीती आचरणात आणुन चौफेर प्रगती करावी असे आवाहन सातारच्या राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी केले.
राजधानी सातारा महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या शिवजागर कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले बोलत होत्या.यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रेरणास्थान आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हापरिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर,आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
राजधानी महोत्सव हा सातारा जिल्हावासियांचा महोत्सव आहे, या महोत्सवाच्या उपक्रमातुन युवकांसह सर्वाना जीवनाची प्रेरणा मिळावी म्हणून शिवजागरसह युवागिरी आणि सातारा गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांचा प्रत्येक सातारकर नागरीकांनी आणि महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही याप्रसंगी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी केले.
यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ प्रदान करुन, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फौन्उेशन ऑपफ कल्चरल अॅक्टीव्हीटी आणि पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीच्या वतीने पंकज चव्हाण व मान्यवरांनी केले.
यावेळी शिवकालीन पोवाडे, मर्दानी खेळ, तसेच शिवकालीन शस्त्रांस्त्रांची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. सुमार 2 ते अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमास उपस्थित आबालवृध्दांनी भरभरुन दाद दिली.
यावेळी संभाजी भिंडे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन, राजधानी महोत्सवास मनापासून शुभेच्छा दिल्या. सातारचा बालकलाकार कुमार विरेन पवार याने आपल्या खणखणीत आवाजात पोवाडा सादर करुन, उपस्थितांची मने जिंकली.सातारच्या नगराध्यक्षा सौ.माधवी कदम यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, सुनिल सावंत, संदिप शिंदे, बाळासाहेब गोसावी, बांधकाम सभापती मनोज शेडे, नगरसेवक दत्तात्रय बनकर, संजय शिंदे, संजय पाटील,किशोर शिंदे, राजु भोसले, बबलु साळुंखे, माजी नगराध्यक्षा व नगरसेविका स्मिता घोडके, सौ.सुजाता राजेमहाडीक,संग्राम बर्गे, काका धुमाळ, गणेश जाधव, आर.वाय.जाधव सर, अॅड.अंकुश जाधव, अॅड.विकास पवार, बाळासाहेब चोरगे, प्रताप शिंदे, सुनील बर्गे, शुभम ढोरे, हर्षल माने, सौरभ सुपेकर,राजु गोडसे,रविंद्र झुटींग,सौ.गितांजली कदम, यांचेसह सातारा परिसरातील बहुसंख्य नगरिक तसेच शिंवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान दिनांक 26 मे रोजी युवागिरी हा गितसंगीताचा खास युवकांसाठी कार्यक्रम आयोजित केला असून, रविवार दिनांक 27 मे रोजी प्रतिष्ठेच्या शिवसन्मान पुरस्कारासह, सातारा गौरव पुरस्काराचे वितरण व पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीचा स्टेप-अप हा कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम शाहू स्टेडीयमवर सायंकाळी 6.00 वांजता होणार आहेत, या कार्यक्रमांना सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |