झिरो पेंडन्सी हा उपक्रम विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अभिनव काम करण्याच्या पद्धतीतून पुढे आला. त्याला पुढे व्यापक स्वरुप आले. आता तर शासनाने राज्यासाठी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत सातारा जिल्ह्यात प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करुन सुंदर, चकचकीत कार्यालयामुळे अल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे . त्यावर टाकलेला हा प्रकाश…!!
जिल्हाधिकारी व अधिनस्त कार्यालयातील (महसूल विभाग) जनतेची कामे वेळेवर होत नव्हती तसेच कार्यालयात कामकाजाचे आस्ताव्यस्त कागदपत्रे दिसून येत होती. तसेच पाठपुरावा केल्याशिवाय प्रकरणांवर निर्णय होतच नाही अशी लोकांची धारणा झाली होती. विभागीय आयुक्त चंद्रकांत दवळी यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आस्ताव्यवस्त कागदपत्रांचे 6 बंडल सिस्टीम पद्धत अवलंबविण्यात आली. यामध्ये कागदपत्रांचे अ,ब,क,क-1 असे वर्गीकरण करण्यात आले. या वर्गीकरणामध्ये अ-कायमस्वरुपी, ब-30 वर्षे, क-10 वर्षे, क 1- 5 वर्षे आणि ड- 1 वर्ष अशी वर्गवारी करुन ड वर्गवारीची कागदपत्रे त्वरीत नष्ट करण्यात आली.
पुणे महसूल विभागात झिरो पेंडसीचे काम आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या आदेशनुसार सुरु होते. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तालुका आणि सर्कलपर्यंत भेटी देवून या कामाचा पाठपुरावा केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील झिरो पेंडसीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचेही काम सुरु करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात महसूल विभागातील विविध कार्यालयांकडून अ वर्गातील 57 हजार 798, ब वर्गातील 2 लाख 17 हजार 440, क वर्गातील 52 हजार 181 व क-1 वर्गातील 1 लाख 49 हजार 858 असे एकूण 4 लाख 77 हजार 277 अभिलेखे अभिलेख कक्षात पाठविण्यात आले.
अ वर्गातील 2 लाख 47 हजार 170, ब वर्गातील 2 लाख 43 हजार 350, क वर्गातील 33 हजार 491 व क-1 वर्गातील 1 लाख 8 हजार 922 अभिलेखे अभिलेख कक्षात अद्यावत करुन ठेवण्यात आलेली आहेत.
आजपर्यंत अ वर्गातील 3 लाख 4 हजार 968, ब वर्गातील 4 लाख 60 हजार 790, क वर्गातील 85 हजार 672 व क-1 वर्गातील 2 लाख 58 हजार 780 अभिलेखे असे एकूण 11 लाख 10 हजार 210 अभिलेख कक्षात अद्यावत करुन ठेवण्यात आलेली आहेत.
ब वर्गातील 47 हजार 492 अभिलेखे, क वर्गातील 33 हजार 866, क-1 वर्गातील 9 लाख 91 हजार 629 व ड वर्गातील 3 लाख 36 हजार 430 असे एकूण 6 लाख 9 हजार 417 अभिलेखे असे जवळपास 45 टन कालबाह्य अभिलेखे नष्ट केल्यामुळे जिल्हा महसूल कार्यालय आता मोकळा श्वास घेत आहे.
जिल्हायामध्ये सर्व तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी, शाखा प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयामधून जनतेच्या व प्रशासकीय कामकाजात होणारा विंलब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा करून विशिष्ट कालमर्यादेत प्रकरणे निर्गत करण्यासाठी झिरो पेंडन्सी ॲड डेली डिस्पोजल अशी कार्यपध्दती 1 मे, 2017 पासून अंमलात आणण्यात आली असून कार्यपध्दती दोन टप्यामध्ये राबविण्यात आली आहे.
झीरो पेंडन्सी ॲन्ड डेली डिस्पोजल तथा तत्पर प्रशासन मोहिमेमध्ये शाखाधिकारी, विशेष भूमीसंपादन, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार असे यांच्याकडे 31 मे 2017 अखेरची शिल्लक 58 हजार 583 प्रकरणे शिल्लक होती. 28 फेब्रुवारी अखेर 11 लाख 64 हजार 453 प्रकरणे प्राप्त झाली त्यापैकी 12 लाख 11 हजार 513 प्रकरणांची निर्गती करण्यात आली असून 28 फेब्रुवारी अखेर 11 हजार 523 प्रकरणे शिल्लक आहेत.
सातारा जिल्ह्यातील तहसील आणि सर्कल कार्यालयात शेकडो जुन्या फाइली वर्षोनुवर्षे तसेच पडून होत्या. त्यामुळे सर्कल, तहसील कार्यालयात अनेक कालबाह्य कागदांमुळे मोठे-मोठे ढिगारे पडून कार्यालयात टेबलावर बसणारा लिपीक त्या फायलीत लपून जायचा. सगळीकडे फायलींचे ढीग ही महसूल प्रशासनाची ओळख प्रशासनासाठी भुषणावह नव्हती त्यामुळे प्रत्येक तहसील आणि काही सर्कलमध्ये जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी प्रत्यक्ष जावून हे दृष्य पाहिले होते. आता जवळपास 45 टन कालबाह्य कागद काढल्यामुळे कार्यालये स्वच्छ आणि प्रसन्न दिसत असून आता रोजच्या रोज फाईली हालत आहेत व विना विलंब जनतेची कामे होत आहेत. ही संकल्पना अगदी छत्रपती शाहू महाराजांनी राबविली होती. मुक्त ती कालबाह्य झालेली कार्य संस्कृती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी नव्या स्वरुपात आणून त्याला गती दिली.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक ही मोहिम राबविली त्याचा परिणाम अतिशय सकारात्मक झाल्याचे आज दिसत आहे.
- युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |