03:30am | Sep 10, 2019 |
कराड : आजवर निवडणुकामध्ये आमचा वापर करून घेतला. मात्र, यापुढे तसे घडणार नाही. येणार्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला कोणीही गृहीत धरू नये. आता आमचंबी ठरलंय. जनतेच्या विकासासाठी आम्ही लवकरच योग्य निर्णय घेऊ, असे स्पष्ट मत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात रविवारी यशवंत जनशक्ती आघाडीच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावर, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, नगरसेवक अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, विकास पवार, आबासाहेब गावडे, रमेश मोरे, संजय शिंदे, जावेद नायकवडी, प्रकाश वायदंडे, माजी नगराध्यक्षा संगीता देसाई, बंडा डुबल, महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेविका आशा मुळे, सुप्रिया खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, अजून पुलाखालून बरच पाणी जायचं आहे. कमी कालावधीत निरोप देवून या ठिकाणी जमलेले लोक, कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती आहे. या मेळाव्याला उपस्थिती म्हणजे शोरूम आहे. अजून गोडाऊन शिल्लक आहे. आमचे नेते खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. सद्यस्थितीत राजकीय उलथापालथी सुरू आहेत, माझ्या कार्यकर्त्यांचा विचार घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. संघर्ष आमचा पाचवीला पुजला असून लढणं आमच्या रक्तात आहे. त्यामुळे भावनिक होवून निर्णय घेण्यापेक्षा विचार करून पाऊले टाकूया, असा सल्ला देवून योग्यवेळी आपली भूमिका जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
हणमंतराव पवार म्हणाले राजेंद्रसिंह यादव यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे समाजकार्य केले. आम्ही सर्व नगरसेवक त्यांच्या पाठीशी आहोत. विजय वाटेगावकर म्हणाले, राजेंद्रसिंह यादव यांनी कॉंग्रेससह सर्व पक्षांना वेळोवेळी मदत केेली पण त्यांना कितीजणांनी मदत केली? पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत त्यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे त्यांनीच या निवडणुकीत नेतृत्त्व करावे. स्मिता हुलवान म्हणाल्या, मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजेंद्र यादव यांची दक्षिण मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. यावरून त्यांची जनमानसातील प्रतिमा समजून येते. ते जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. प्रारंभी सचिन पाटील यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. यावेळी आर.के.पवार, सरपंच रवींद्र थोरात, रमेश गोरे, प्रकाश वायदंडे, अतुल शिंदे, संगीता देसाई, पोळ मॅडम आदींनी मनोगते व्यक्त केली. सचिन पाटील यांनी आभार मानले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |