कुडाळ : तीव्र उन्हाळ्यात एका हंडाभर पाणी मिळावे म्हणून एकवटलेल्या जावली तालुक्यातील डोंगरी भागात असणारे दुंद आणि ऐकीव गावच्या सरहद्दीवर आज चक्क बोरीचा बार भरला. तोडलेली पाईप जोडणी साठी गेलेल्या दुंद ग्रामस्थांना विरोध केल्याने दुंद व ऐकीव ग्रामस्थ महिलांमध्ये तुफान शिवीगाळ व बाचाबाची झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दुंद गावाला ऐकीव गावच्या पाईपमधून पाणी देण्याची सोय करण्यात आली होती. दुंद गावातील लोकांनी लोकवर्गणीतून गावात ऐकीव सरहद्दीतून पाणी आणलं होतं. मात्र दुंद ग्रामस्थांच्या दिलेल्या माहिती वरून स्थानिक राजकारणापोटी दुंद गावच्या दिशेने ऐकीवमधून जोडलेली पाईप कुण्या समाजकंटकाने तोडली व त्यानंतर गावाला पाणी मिळण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. या घटनेकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही. उन्हाळा सुरू होताच पाण्यासाठी होणारी वणवण रोज होणारी फरपट याला कंटाळून सकाळी दुंद ग्रामस्थ महिला यांनी क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला. एकवटलेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी ऐकीव गावातील पाईप जोडून गावात मुबलक पाणी आणण्याचा निर्धार केला. ग्रामस्थ, महिलांसंह आज दुपारी एकीव येथे गेल्यावर एकीव ग्रामस्थ, महिला विरूद्ध दुंद ग्रामस्थ, महिला असा पाण्यावरून जोरदार संघर्ष सुरू झाला.
स्थानिक राजकारणातून हा प्रकार घडल्याची परिसरात चर्चा आहे. शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे बनले होते.पण काही शांतताप्रिय ग्रामस्थांमुळे हा राडा थांबून मोठी हाणामारी टळली. दरम्यान, संतप्त दुंद व ऐकीव चे ग्रामस्थ यांच्यातील पेटलेली संघर्षाची ठिणगी कोणते रूप धारण करणार? हे येणारा काळच सांगेल. पावसाच्या जावलीत पाण्यासाठी सरहद्दीवर झालेला बोरीचा बार तालुक्यावर राज्य करणार्या स्थानिक झेडपी व पंचायत समितीच्या नेत्यांना खाली माना घालायला लावण्यासारखा प्रकार घडला आहे. इतकं होऊन देखील एकाही स्थानिक स्वराज्य संस्था नेत्याने काय घडलं याची चौकशी देखील केली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी जावलीत एकमेकांची डोकी फुटण्याची वेळ आली असताना नेतेमंडळी मात्र या प्रकाराचा आनंद घेत बसली आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |