कराड : रयत सहकारी साखर कारखान्याची बिघडलेली आर्थिक घडी बसवणेत तीन वर्षांत यश आले असून या कालावधीत ५२ कोटी रूपयाचा संचित तोटा २२कोटी रुपयांपर्यत खाली आला आहे. येत्या दोन वर्षात पूर्ण तोटा भरून निघेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन ऍड उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
शेवाळेवाडी- म्हासोली ता.कराड येथे रयत कारखान्याच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हा चेअरमन आप्पासाहेब गरुड,खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात,शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहनराव माने,कराड पंचायत समितीच्या सभापती फरीदा इनामदार, प्रा.धनाजी काटकर, अथणी - रयत युनिटचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयसिंह पाटील पुढे म्हणाले,२२ वर्षा पूर्वी शेतकर्याचा मागणीवरून रयत कारखान्याची उभारणी माजी मंत्री विलासराव पाटील- काकांनी केली. त्यावेळच्या तत्कालीन कारणामुळे कारखान्यापुढे अडचणी निर्माण झाल्या.शाहू कारखान्या बरोबर काही वर्षे भागीदारी केली तर काकाच्या वर आलेल्या राजकीय संकटकाळात संचालक मंडळाने दोन वर्षे कुमुदाशी करार करून कारखाना चालवला. या दोन वर्षात निर्माण झालेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर कारखाना मोडीत काढण्याचा राजकीय डाव काही मंडळींनी साधला. मात्र अथणी शुगर्स बरोबर भागीदारी कराराच्या माध्यमातून हा डाव आपल्याला उधळून लावता आला.गत वर्षी ऊस तोडणी बाबतच्या तक्रारी निर्माण झाल्या त्या यावर्षी होता कामा नयेत याबाबत अथणी रयत च्या व्यवस्थापनाने सयुक्तिक निर्णय घेतला आहे.ऊस दर स्पर्धात्मक राहण्यासाठी साखर उतारा वाढला पाहिजे यासाठी जवळील ऊस जास्ती जास्त उचलणे याबाबत ही नियोजन झाले असलेचे त्यांनी स्पष्ट केले.
रवींद्र देशमुख म्हणाले,गत गळीत हंगामात तोडणी वाहतूक यंत्रणेमुळे ऊस तोडीच्या अडचणी निर्माण झाल्या. यामुळे शेकर्यांनाही त्रास झाला याबाबत आम्ही या हंगामात पूर्णतः दक्षता घेणार आहोत. साखरेच्या उतरलेल्या दरामुळे ऊस पेमेंट ही वेळेवर पोचवता आले नाही या हंगामात ऊस पेमेंट वेळेवर अदा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी जाहीर केले. आम्ही रयत कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी ८२ कोटी एकूण देणी होती त्यापैकी ३५ कोटी देणी आम्ही अदा केली असून रयत च्या सभासदांना जास्ती जास्त सेवा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
सभेचे नोटीस वाचन चीफ अकाऊंटंट शैलेशकुमार देशमुख यांनी केले एक ते सात विषय एकमताने मंजूर करणेत आले. ऐनवेळेस आलेल्या विषयावर सभासदाच्या शंकाचे निर्सन चेअरमन पाटील यांनी केले.सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रारंभी श्रद्धांजली ठराव संचालक जयवंतराव मोहिते यांनी मांडला.सूत्रसंचालन राजेंद्र पाटील, प्रास्ताविक मोहनराव थोरात यांनी तर आभार आप्पासाहेब गरुड यांनी मानले.
सभेस माजी सभापती प्रदीप पाटील, कसनराव जाधव, अशोक पोतलेकर, टी.के.पाटील, काशिनाथ कारंडे, रयत चे संचालक गोपीचंद चव्हाण, शंकरराव पाटील, शंकरराव थोरात, पंजाबराव देसाई, प्रशांत पाटील, दगडू पाटील, तुकाराम काकडे, शशिकांत साठे, पोपटराव घारे, कारखान्याचे अधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |