RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

'दगडूशेठ' ला १२६ किलोच्या मेव्याच्या मोदकाचा महानैवेद्य

14 September 2018 at 19:29

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या १२६ वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवात गणपतीला १२६ किलोच्या मेव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखविण्यात आला. बार्शीचे किराणा व्यापारी कचरुलाल देबडवार यांनी हा मोदक बाप्पाला अर्पण केला असून काका हलवाईचे युवराज गाडवे आणि महेंद्र गाडवे  यांनी कारागिरांच्या सहाय्याने अवघ्या चार तासात हा मोदक साकारला आहे. 

यंदाचा देखावा असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात १२६ किलो मोदक पाहण्यासोबतच त्याचे फोटो घेण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. गाडवे यांच्यासह काका हलवाईमधील ६ ते ८ कामगारांनी हा मोदक तयार केला आहे. अत्यंत आकर्षक कलाकुसर व सजावट या मोदकावर करण्यात आली आहे. 

युवराज गाडवे म्हणाले, मेव्याच्या मोदकावर काजू, बेदाणे, बदाम, केशर यांसह विविध प्रकारचा सुकामेवा लावण्यात आला आहे. याशिवाय वरच्या बाजूला चांदी व सोन्याचे वर्क लावण्यात आले आहे. मागील वर्षी देखील ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १२५ किलोचा मोदक साकारण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळनंतर काका हलवाई मध्ये हा ठेवलेला हा मोदक पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

 

राज्यातील आरटीओच्या ३७ अधिकार्‍यांचे निलंबन

राज्यातील 7 प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नियमबाह्यपणे योग्यता प्रमाणपत्र जारी केल्याचे निष्पन्न झाल्याने 28 मोटर वाहन निरीक्षकांसह 9 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना आज गृहविभागाने निलंबित केले आहे.

23 hours before

विहिरीतून पाणी उपसल्यास मालकाकडून कर

'दुष्काळात तेरावा महिना' असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आता खरंच आली आहे. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाण्याचा उपसा केल्यास विहीर मालकाला कर द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.

yesterday

डॉल्बीवर बंदीच, विसर्जन मिरवणुकीत डीजे नाही : हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. हायकोर्टानं डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत पाला संघटनेची याचिका फेटाळून लावली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर कोर्टानं डीजेवरची बंदी कायम ठेवली.

yesterday

येत्या 24 तासात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

yesterday