वेणेगाव : देशमुखनगर येथे जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनी संतोष चौधरी व पोलिस कर्मचार्यांना शकीला मुलाणी, समीर गुलाब मुलाणी (वय 28) आणि आमीर मुलाणी यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी त्यांनी चौधरी यांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या जुगार अड्ड्यावरील कारवाईत 70 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबाचीवाडी येथील बामनाचा ओढा नावाच्या शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सपोनि संतोष चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत दुधाणे, हवालदार किरण निकम, राजू शिखरे, समाधान राक्षे, सिद्धनाथ शेडगे, चालक धनंजय जाधव यांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. त्यानंतर पोलिस शकिला मुलाणी, समीर व अमीर मुलाणी यांना ताब्यात घेत असतानाच या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.
शकिला या चौधरी यांच्या अंगावर धावून जात असतानाच समीरने चौधरी यांचा गळा आवळला. यावेळी आमीर व शकीला यांनीही चौधरी यांच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी या सर्वांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समीर व आमीर व शकीला आणि पोलिसांत झटापटी झाली. या झटापटीत शकीला व आमीर हे पसार झाले. या प्रकरणी रात्री उशिरा संतोष चौधरी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |