12:27am | Apr 29, 2018 |
सातारा: वारंवार मागणी करुनही नवीन मोबाईल घेवून देत नाहीत म्हणून पंधरा वर्षीय बालकाने संतापाच्या भरात विषप्राशन केल्याची घटना खटाव तालुक्यातील नढवळ येथे शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. सुमीत कुकळे असे या बालकाचे नाव असून त्याच्यावर येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, मोबाईल घेत नाहीत म्हणून बालकानेच जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्यामुळे नढवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत जिल्हा रुग्णालयातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमीत संजय कुकळे (वय १५) हा मुलगा आपल्या कुटुंबासमवेत राहतो. स्वत:साठी नवीन मोबाईल मिळावा म्हणून गेले काही दिवस तो घरातील माणसांकडे सारखा आग्रह धरत होता. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तो झोपेतून जागा झाला. यानंतर त्याने अंथरुणातून बाहेर पडतच विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्याच्या घरातील व्यक्तिंच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सुमीतला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. येथील प्राथमिक उपचारानंतर त्याला तत्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, नवीन मोबाईल घेण्याच्या कारणावरुन सुमीतने विषप्राशन केले आहे. त्या अनुषंगाने आमची कोणाबाबत आणि कोणाविरोधात तक्रार नाही, असे सुमीतच्या नातेवाईंकांकडून जिल्हा रुग्णालयात दिलेल्या जबाबत म्हटले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |