कराड : शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर (शिविम) यांच्यावतीने मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना त्यांच्या आजारपणातील औषधोपचारासाठी 1 लाख 11 हजार रूपयांच्या मदतीचा धनादेश संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी नुकताच त्यांना सुपुर्द केला.
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे हे वृद्धापकाळात आजारपणाने त्रस्त असल्याचे आणि उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून प्रसारित झाले होते. याची ‘शिविम वॉटसअॅप’ ग्रुपवर चर्चा होऊन अध्यक्षांनी मदत देण्याचे आवाहन केले होते. शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्राध्यापकांनी ‘शिविम’ च्या बँक खात्यावर मदत जमा केली. त्या सर्व मदतीची रक्कम तुपे यांना पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी जावून शिष्टमंडळाने त्यांना सुपुर्द केली. तुपे यांचे मराठी साहित्यामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या झुलवा, काटयावरची पोटं, भस्म, इंजाळ, खुळी इत्यादी साहित्यकृती विशेष गाजल्या. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराबरोबरच विविध साहित्य संस्थाकडून त्यांना मानपत्र देऊन गौरविले आहे. सध्या ते व त्यांची पत्नी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे.
अत्यंत संवेदनशील मनाने प्राध्यापकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. साहित्याचे अध्ययन आणि अध्यापन करणार्या प्राध्यापकांनी साहित्यिकांशी बांधिलकी जाणून माणुसकी जोपासली. सोशल मिडियाचा सकात्मक वापर करून विधायक कार्य घडविण्यात सकात्मक शिक्षकांच्या दानशुराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शिविमचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रमेश पोळ, सचिव डॉ. प्रकाश दुकळे, कार्यकारिणी सदस्य प्रा.डी.जे.दमामे, डॉ.हणमंत पोळ व इतर उपस्थित होते.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |