04:05pm | Apr 30, 2019 |
सातारा : देशभरात व जगभरात विविध कांड, प्रकरणे गाजत असताना फलटणमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत अर्ज कांड भलतेच गाजले आहे. या कांडाची चर्चा मात्र जिल्ह्यात व राज्यात तुफान व्हायरल झाल्यामुळे विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजेंवर मात्र नामुष्कीची वेळ ओढावलेली आहे.
फलटण तालुक्यातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस रसातळाकडे मार्गक्रमण करीत आहे. स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी कोण कोणत्या थराला जाईल, याचा नेम राहिलेला नाही. अर्जांवरील अर्जांमुळे पोलीस दलाचीही डोकेदुखी भलतीच वाढलेली आहे. माढा लोकसभेची निवडणूक फलटण तालुक्यासाठी प्रतिष्ठेची होती. या निवडणुकीत अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेले आहे. मात्र 23 मे पर्यंतची अनेकांना कळ सोसवली नसल्यामुळे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 25 एप्रिल रोजी असाच एक अर्जाचा बॉम्ब टाकण्यात आला. पारंपारिक प्रतिस्पर्ध्यासाठी अभिप्रेत असणारा हा अर्ज लागलीच विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधील एका व्हॉटसऍप ग्रुपवर टाकला. चक्क विधान परिषदेच्या सभापतींनीच अशा प्रकारचा अर्ज टाकल्यामुळे त्या ग्रुपवर आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. थेट फलटणमधील गजानन चौकातील चव्हाट्यावर खल करण्याचे आव्हान देण्यात आले. परंतू सभापतींच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी चर्चेतून काढता पाय घेतला. मात्र, शिलेदारांना चर्चेत धाडले. या अर्जाची चर्चा फलटण तालुक्यात तुफान चर्चिली गेली. मात्र सभापतींनी ग्रुपवर टाकलेला अर्ज संबंधित अर्जदाराने केवळ पाचच दिवसांत मागे घेतल्याने व माफीनामा लिहून दिल्याने विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजेंवर नामुष्कीची वेळ आली आहे. कट्टर कार्यकर्त्याच्या या बुमरँगमुळे फलटण तालुक्यात सोशल मीडियावर मात्र सभापतींच्या आततायीपणाची चर्चा आहे.
निरगुडी, ता. फलटण येथील सचिन सर्जेराव सस्ते हे श्रीमंत रामराजे युवा मंच, निरगुडी या संघटनेचे अध्यक्ष म्हणून गेली पाच वर्षे काम करीत आहेत. माढा लोकसभेच्या अनुषंगाने ते या निवडणुकीत सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. असे असताना त्यांनी 25 एप्रिल रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माढा लोकसभेचे उमेदवार संजयमामा शिंदे यांचे काम करतो म्हणून मला जिवे मारण्याची धमकी देवून गुंडांना खून करण्याची सुपारी दिली असल्याचा अर्ज त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिला होता. या अर्जामध्ये स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्यापासून जिवितास धोका असल्याचाही उल्लेख केला होता. या अर्जामुळे पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली होती.
लागलीच आपल्या कट्टर कार्यकर्त्याचा अर्ज विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटणमधील एका व्हॉटसऍप ग्रुपवर टाकला. या ग्रुपमध्ये सर्वच राजकीय पुढार्यांची रेलचेल आहे. हा अर्ज सभापतींनी टाकल्यानंतर स्वराज संघटनेच्या दिगंबर आगवणे यांनी या अर्जाचे खंडण करीत थेट सभापतींनाच गजानन चौकातील चव्हाट्यावर येवून चर्चा करण्याचे आव्हान दिले. आरोप-प्रत्यारोपांमुळे तो व्हॉटसऍप ग्रुप दणाणून गेला. फलटण तालुक्यात सोशल मीडियावरील या चर्चांमुळे वातावरण तापले असतानाच मूळ अर्जदार सचिन सस्ते यांनी काल दि. 29 रोजी मी दिगंबर आगवणे यांच्या विरोधात गैरसमजुतीने तक्रार दिली होती. त्यांच्या विरोधात दिलेला तक्रारअर्ज मी स्वेच्छेने माघारी घेत आहे, असा माफीनामा दिल्यानंतर मात्र फलटण तालुक्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सचिन सस्ते हा विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. ज्या कार्यकर्त्याचा अर्ज मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तत्परतेने ग्रुपवर टाकला, त्याच कार्यकर्त्याने तोच अर्ज गैरसमजुतीने दिला गेला असल्याचा खुलासा व माफीनामा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यामुळे कट्टर कार्यकर्त्याच्या या माफीनाम्यामुळे मात्र मिस्टर रामराजेंवर नामुष्कीची वेळ आली आहे, अशी चर्चा फलटण तालुक्यासह जिल्ह्यात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |