कराड : कराड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय संपादन केला, त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाकडून आ.बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.आबासाहेब पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, डे. ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस.साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की, सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून तसेच विधानसभा सदस्य या नात्याने मतदार संघात अधिकच्या संबंधामुळे व सर्वांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुखर झाला.
येणार्या पाच वर्षांच्या काळात मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.बी.चव्हाण यांनी केले, शेती अधिकारी मोहनराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व एस.जी.चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे विभाग प्रमुख, फिल्डमन, क्लार्क, स्लिपबॉय व ऊस विकास कर्मचारी उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |