10:50pm | Oct 09, 2019 |
सातारा : निवडणूक आली की काही जणांच्या अंगात आमदारकीचं भूत संचारत. पाच वर्षात काही काम करायचं सोडा पण, फिरकायलाही यांना फुरसत नसते. आता निवडणूक आली असून अशी भूछत्रे साताऱ्यात फिरताना दिसत आहेत. सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात माझ्या माध्यमातून शेकडो कोटींची विकासकामे झाली आहेत आणि यापुढेही होणार आहेत. त्यामुळे बेगडी प्रेम दाखवणाऱ्याना नेहमीप्रमाणे घरचा रस्ता दाखवून आम्ही केलेल्या कामांची पोहोच पावती जनतेने मतदानातून द्यावी, असे आवाहन सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, सातारा शहरात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रांचा धडाका सुरु असून पदयात्रांना सातारकर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले व विधानसभेचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारात स्वतः सहभागी घेऊन सातारकरांनी दोन्ही उमेदवारांच्या विजयाची घोडदौड सुरु केली आहे.
बुधवार सकाळी ७ वाजता नगर पालिका शाहू चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचार पदयात्रेला प्रारंभ झाला. कुंभारवाडा, पोरे वकील घर, आयडीबीआय बँक, शिक्षक बँक, तहसील कार्यालय, भाजी मंडई, सैनिक कॉलनी, चांभार वस्ती, वडार वस्ती, ओम सुंदर फोटो, आंबेकर दुकान, श्रीनाथ मंदिर चौक, लकी आर्ट्स, पावन हनुमान मंदिर, ७४ मल्हार पेठ, जगताप कॉलनी, अक्सीस बँक, भोसले मळा, कर्मवीर सोसायटी, सेनॉर चौक, मल्हार पेठ, प्रभाकर टूर्स, तपासे गल्ली, पोलीस ठाणे, मुरलीधर भोसले ते दीपलक्ष्मी नाईक घर असा प्रचार दौऱ्यातील पदयात्रेचा मार्ग होता. यावेळी नागरिकांशी सवांद साधून शिवेंद्रसिंहराजे यांनी कमळाला विजयी करण्याचे आवाहन केले.
पदयात्रेत उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमवेत नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, नगरसेवक अशोक मोने, धनंजय जांभळे, अमोल मोहिते, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, श्रीकांत आंबेकर, राम हादगे, बाळासाहेब खंदारे, दीपलक्ष्मी नाईक, भाऊ पाटोळे, सविता फाळके, सतीश जाधव, हेमा तपासे, प्रकाश बडेकर, बाळासाहेब नाईक, अनिता घोरपडे, अशोक जाधव, योगेश चोरगे, शिंगरे आदी मान्यवर तसेच आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
यावेळी फटाक्यांची आतशबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचॆ उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
या वेळी नागरिकांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, आम्ही मतदारसंघाच्या विकासासाठी बांधील आहोत. सातारा- जावळी मतदारसंघात एकही गाव विकासापासून वंचित ठेवले नाही. यापुढे भाजप सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात आणि सातारा शहरात गतिमान विकास करून मोठमोठी विकासकामे मार्गी लावणार आहे. त्यामुळे निवडणुकीपुरत्या उगवणाऱ्या विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता कमळ चिन्हापुढील बटन दाबून आम्हा दोघांना तुमची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सातारकरांना केले.
आजच्या पदयात्रेचा मार्ग
गुरुवार दि. १० रोजी सकाळी ७ वाजता अदालत वाडा येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून अदालत वाडा, पै. चौक, वाघाची नळी, देवी चौक, कमानी हौद, कूपर कारखाना, ऍड. कमलेश पिसाळ घर, ते ठोंबरे घर, शिंदे गल्ली, घोरपडे वखार, अगर पालिका ऑफिस ते चार भिंती या मार्गावर पदयात्रा निघणार असून पदयात्रेला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ६ ते ८ यावेळेत काशी विश्वेश्वर चौक आणि ८ ते १० यावेळेत अरुण टेलर, पुणेकर घराजवळ येथे कोपरा सभा होणार असून सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |