सातारा : आज पहाटे कोरेगाव तालुक्यात रात्रगस्त घालत असताना पोलीस गाडीवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सुमो गाडी झाडावर आदळल्यामुळे कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, गाडीच्या चालकही जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी काल रात्री रहिमतपूरमध्ये रात्रगस्त घालत असताना रहिमतपूर-औंध रस्त्यावर आज पहाटे पोलीस जीप क्र, एमएच 11 एबी -308 या गाडीच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ती गाडी सरळ झाडावर जावून धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की संपूर्ण गाडीचा चेंदामेंदाच झाला. पहाटेच्या वेळी कदाचित वाहनचालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे अपघात झाल्याचा कयास पोलीसांनी वर्तवला आहे. या अपघातामध्ये प्रेरणा कट्टे यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच चालक पोलीस नाईक विक्रम शिंदे यांनाही गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. दरम्यान, दोघांनाही सातारा येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी संबंधित जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |