RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

देशातील पहिलीच महिला SWAT टीम दिसणार लाल किल्ल्यावर

10 August 2018 at 19:16

नवी दिल्ली : देशात आज महिलांची पहिली SWAT (स्‍पेशल वेपन अँड टॅक्‍ट‍िस टीम) टीम सेवेत रुजू होणार आहे. त्यांना दिल्लीत सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. या पहिल्या कमांडो टीममध्ये 36 महिलांचा समावेश आहे. यामध्ये पुर्वोत्तर राज्यातील महिला आहेत. त्यांना देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांनी 15 महिने खडतर प्रशिक्षण दिले. 

देशात महिलांची पहिली SWAT टीम तयार करण्याची कल्पना दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी पुढे आणली. त्यांनी म्हटले की, अतिरेकी हल्ले, बंधकांना सोडवणे किंवा इतर कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी ही टीम सक्षम आहे.

अनेक मोठ्या देशांमध्ये अद्याप SWAT टीम नाही. अशावेळी भारताकडे महिला टीम असणे मोठी गोष्ट आहे. येत्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी या महिला कमांडोवर सोपवण्यात आली आहे.

SWAT टीममध्ये 36 महिलांपैकी सर्वाधिक 13 महिला कमांडो आसामच्या आहेत. तर अरुणाचल प्रदेश, सिक्किम आणि मणिपूरमधी प्रत्येक 5, मेघालय- 4, नागालँड-2 आणि मिझोराम, त्रिपुरातील प्रत्येकी एका महिला कमांडोचा समावेश या टीममध्ये आहे.

हातात कोणतेही हत्यार नसताना या महिलांना समोरच्याशी लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी इस्त्रायलचे ‘कर्व मागा’चे प्रशिक्षण घेतले. याशिवाय त्यांना शस्त्रास्त्रे चालवण्याचेही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या महिला कमांडोंना मध्य आणि दक्षिण दिल्लीतील काही ठिकाणांवर तैनात करण्यात येईल. दिल्लीत महिलेच्या मदतीने आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर संस्थेने दिली आहे. या महिला कमांडो अशा प्रकारच्या हल्ल्याला रोखू शकतात.

यातील सर्वाधिक महिला कमांडोंना दहशतवाद विरोधी पथकातील ‘पराक्रम’मध्ये तैनात केले जाणार आहे. पराक्रम मधील कमांडो अनेकमजली इमारतींवर चढणे, हॉटेल, बस किंवा मेट्रोतील बंधकांना वाचवण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतात.

SWAT टीम मधील सर्व महिला पुर्वोत्तर राज्यातील असल्याने त्यांना प्रशिक्षणादरम्यान भाषेची अडचण येत होती. त्यासाठी त्यांनी उत्तर पूर्व राज्यातीलच एका इन्स्ट्रक्टरची नियुक्ती केली होती.

दिल्‍ली पोलिस आणि कमांडो ट्रेनिंग सेंटर झारौदा कला आणि एनएसजी कमांडोंसाठीचे मानेसर येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. पुरुषांसाठी 12 महिन्यांचे असलेले प्रशिक्षण महिलांना 15 महिने देण्यात आले. यातील 3 महिन्यांचे SWAT ट्रेनिंग खास प्रशिक्षकांनी दिले.

कोणत्याही शस्त्राशिवाय लढणे, शत्रूवर हल्ला करणे, हल्ल्यापासून बचाव करणे, जंगलासह नागरी वस्तीत किंवा गर्दीच्या ठिकाणी मोहीम करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. तसेच अतिमहत्वाच्या सुरक्षेची जबाबदारीही त्या पार पाडू शकतात. त्यांना स्फोटक पदार्थांची प्राथमिक माहितीही देण्यात आली आहे. याशिवाय आयईडीच्या वापराबद्दल त्यांना सांगण्यात आले आहे.

अमेरिकेच्या धर्तीवर भारतातही SWAT कमांडोची टीम तयार करण्यात आली होती. यांचे प्रशिक्षण खडतर असते. कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा खात्मा करण्याची क्षमता या दलामध्ये असते. यातील कमांडोना हवाई, जल किंवा जमिनीवरील कोणतीही मोहिम पूर्ण करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले असते. इतकेच नाही तर अंधारातही त्यांना शत्रूला ओळखता येईल तसेच त्याच्याशी लढण्याचे प्रशिणक्ष दिले जाते. दहशतवादी आणि नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेची जबाबदारी यांच्यावर सोपवली जाते. 

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर भारतात SWAT टीम तयार करण्‌याची गरज निर्माण झाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली. 

सैन्यात निकृष्ट अन्न दिले जाते म्हणणाऱ्या 'त्या' जवानाच्या मुलाचा गूढ मृत्यू

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते, असा व्हिडिओ शूट करून तो सोशल मीडियावर टाकणारा सीमा सुरक्षा दलातील निलंबित जवान तेज बहादूर याचा मुलगा रोहित मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

18 January 2019 at 14:01

मध्यमवर्गीयांसाठी खूशखबर, आता पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न होणार करमुक्त

मध्यमवर्गीयांना दिलासा देत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली लवकरच करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दुपटीने वाढवण्याची शक्यता आहे.

15 January 2019 at 15:41

न्या. सिक्रींनी नाकारला राष्ट्रकुल प्राधिकरणाच्या सदस्यत्वाचा प्रस्ताव

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी केंद्रातील मोदी सरकारने दिलेला राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरण (CSAT) सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारला आहे.

14 January 2019 at 02:49