सातारा : ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी विवाह कर, अन्यथा तुझा ठरलेला विवाह मोडून टाकीन अशी धमकी देऊन युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समीर उर्फ मोहसीन उर्फ कानया जावेद कोतवाल (वय 30, रा. राजसपुरा पेठ ,सातारा) याला पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्रन्यायाधीश आर. डी. देशपांडे यांनी 5वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, कण्हेर धरणावरील तीन वर्षापूर्वी ही घटना घडलेली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, समीर उर्फ काल्या जावेद कोतवाल याचे प्रगती सुपेकर (वय 23, रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांची ओळख होती. समीर कोतवाल याची इच्छा होती की प्रगती सुपेकर हिने त्याच्याशी विवाह करावा. मैत्रिण प्रगती हिला त्याबाबत बोलून दाखवल्यानंतर तिने मात्र त्याला नकार दिला. 2015 मध्ये प्रगतीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह देखील ठरवला होता. दरम्यान, समीरला तिच्या विवाह ठरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्यावर मानसिक दडपण निर्माण केले. तिला विविध प्रकारे धमकी देऊ लागल्याने प्रगती मानसिक तणावाखाली होती.
समीर कोतवाल मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे अखेर समीरच्या त्रासाला कंटाळून प्रगती सुपेकर हिने दिनांक 9 मे 2015 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कण्हेर धरणावर धरणावर जाऊन विष प्राशन केले. या घटनेतच तिचा मृत्यू झाला. याबाबत मयत युवतीच्या वडीलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी फौजदार एस. टी. साठे व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एल. जाधव यांनी उर्वरीत तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकील अॅड. महेश शिंदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडून साक्षीदार तपासले त्यामधील चार साक्षीदार फितूर झाले होते . परंतु न्यायालयाने वस्तुनिष्ठ पुरावा ग्राह्य मानून आरोपी समीर उर्फ मोसीन उर्फ जावेद कोतवाल याला पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे शमशुद्दीन शेख, सुनील सावंत, कांचन बेंद्रे ,महिला हवालदार वाघ यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |