01:20am | Apr 02, 2018 |
सातारा : सातारा शहर परिसरातील सदरबझार येथे दि. ३० रोजी मध्यरात्री तलवारीने केक कापून, फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत आणखी एक असाच गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या घटनेने सातार्यात खळबळ उडाली आहे.
सहाय्यक फौजदार श्रीधर एकनाथ पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ते शहर पोलिस ठाण्याच्या सदरबझार चौकीत कार्यरत आहेत. श्रीधर पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. ३० रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सदरबझार येथील भारतमाता चौक ते सैनिक नगर या रस्त्यावर सुमारे ५० ते ६० अनोळखींनी गर्दी केली होती. यावेळी संशयितांनी वाढदिवसानिमित्त फटाके वाजवून सार्वजनिक शांततेचा भंगही केला.
संशयितांनी गोंधळ घालत धारदार तलवारीसारखे शस्त्र काढून वाढदिवसानिमित्त केक कापला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर परिसरात पोलिस गेले असता संशयित तेथून पसार झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रविवारी दुपारी उशीरा पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, अशाच पध्दतीने सातारा शहरात आणखी एका ठिकाणी बेकायदा जमाव जमवून तलवारीसारख्या धारदार शस्त्राने केक कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचे सत्र अवलंबल्याने सातार्यात खळबळ उडाली आहे. गुन्हे दाखल करत असताना जेव्हा जेव्हा केक कापले गेले त्यावेळचे व्हिडीओ शुटींग, फोटो मिळवण्याची प्रक्रिया पोलिसांची सुरु होती.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |