कराड : यंदाच्या गळीत हंगामात पश्चिम महाराष्ट्रासाठी सरासरी १२.५० टक्के उतारा ग्राह्यधरून पहिली उचल एकरकमी ३,२१७ रूपये दिल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याची घोषणा खा. राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत केली आहे. असे असतानाही सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जिल्ह्यातील दर जाहीर न करताच ऊस तोड सुरू केली आहे. त्यांनी पहिल्यांदा दर जाहीर करावा, अशी मागणी करत स्वाभिमानाने पार्ले-बनवडी, ता. कराड येथे ऊस वाहतूक रोखली. तसेच तोडही बंद पाडली.
यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल एकरकमी ३२१७ रूपये देण्यात यावी, अन्यथा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा निर्णय जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत घेण्यात आला आहे. शिवाय जे कारखाने आता सुरू आहेत, ते बंद करण्याचेही आवाहन यावेळी केले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच ऊस तोडी सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
रविवार दि. २८ रोजी पार्ले-बनवडी, ता. कराड येथून ऊस वाहतूक करणारे ट्रक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी अडवले. तसेच त्या परिसरातील ऊसतोड बंद पाडली. जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत जाहीर करण्यात केलेला ऊस दरानुसार सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर करावा आणि मगच कारखाने सुरू करावेत, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
दरम्यान, सरकारने एफआरपीमध्ये अर्धा टक्याने वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिटन १८४ रुपये तोटा होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत कारखाने एफआरपीचा जूना साडे नऊ टक्क्याचा आधार पकडून अधिक २०० रुपये दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत ऊस तोड घेवू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन
गतवर्षीच्या गळीत हंगामात जाहीर केलेल्या दराप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना बिले द्या. तसेच यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल किती देणार? हे जाहीर करा, अन्यथा स्वाभिमानी तीव्र आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी कारखानदाराची राहील.
- सचिन नलवडे , जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |