04:25pm | May 15, 2019 |
सातारा : म्हसवड, ता. माण येथे पोलादपूर-पंढरपूर महामार्गाच्या सुरु असलेल्या कामावरील ‘साईट सुपरवायझरला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 मार्च 2019 रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्याच कामावरील चार अभियंता अटकेत आहेत. मात्र, या कामावरील ठेकेदार आर. के. चव्हाण मात्र गेल्या दोन महिन्यांपासून गुन्हा दाखल होवूनही मोकाट आहे. म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि. मालोजीराव देशमुख यांनी आर्थिक तडजोडी केल्यानेच गुन्हा दाखल होवूनही आर. के. चव्हाण याला पोलीस अभय देताहेत, असा आरोप मृत ‘साईट सुपरवायझरच्या कुटूंबियांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रविण गोवर्धन शिंदे (वय 23) रा. अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापूर हा युवक काही वर्षांपासून पोलादपूर- पंढरपूर महामार्गाच्या सुरु असलेल्या कामावर ‘साईट सुपरवायझर म्हणून काम पाहत होता. हे काम पुणे येथील ठेकेदार आर. के. चव्हाण करीत आहेत. आर. के. चव्हाण तसेच त्यांचे अभियंता प्रदीप पवार, विष्णु शेलार, सौरभ सिंघल, जयंत राणे हे मृत प्रविण शिंदे यांचा जाणीवपूर्वक शारीरिक व मानसिक त्रास छळ करीत होते. शेवटी या सर्व गोष्टींचा त्रास असह्य झाल्यामुळे दि. 5 मार्च 2019 रोजी प्रविण शिंदे यांनी म्हसवड येथील भाड्याने रहावयास असलेल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्त्या केली होती. आत्महत्त्या करताना प्रविण शिंदे यांनी 'सुसाईड नोट'ही लिहिली होती. संबंधित 'सुसाईड नोटच्या अनुषंगाने पोलिसांनी तपासही केला. त्याद्वारे वरील चार अभियंता व ठेकेदार आर. के. चव्हाणवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, आर. के. चव्हाण हा मोठा ठेकेदार असल्याने म्हसवड पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोडी करुन त्याला अभय देण्याचे काम केले आहे, असा आरोप मृत प्रविण शिंदे यांच्या कुटूंबियांनी केला आहे. यासंदर्भात म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि. मालोजीराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला अक्षरश: हाकलून दिल्याचा आरोप मृत शिंदे यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे. या संदर्भात सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनाही निवेदन देण्यात आले आहे. आर. के. चव्हाण हा महाराष्ट्रातील रस्ते बांधणीतील मोठा ठेकेदार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अनेकवेळा म्हसवड येथे सुरु असलेल्या कामावरही येवून गेला आहे. हे म्हसवड पोलिसांना माहिती असूनही त्यांनी त्याला अटक केली नाही, अशी माहिती मृत शिंदे यांची आई व या गुन्ह्यातील फिर्यादी जमुना गोवर्धन शिंदे यांनी दिली. तसेच माझ्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आर. के. चव्हाण यांना पाठिशी घालणार्या सपोनि मालोजीराव देशमुखांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |