मुंबई : राज्यातील १९ लाख शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापोटी अंतरिम वेतनवाढ देण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही वाढ किती व कधीपासून द्यायची याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी संघटनांनी रेटा लावला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून आयोगानुसार वेतनवाढ, भत्ते व इतर सुविधा मिळत आहेत. त्याच तारखेपासून राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आहे. परंतु राज्य सरकारने या आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी माजी अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांची समिती नेमली आहे. समितीचे कामकाज सध्या सुरू आहे. परंतु समितीकडून अहवाल येण्यास विलंब होत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
नागपूरमध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काही आमदारांनी सातवा वेतन आयोग कधीपासून लागू करणार अशी पत्रे पाठवून अर्थमंत्र्यांकडे विचारणा केली होती. त्यावर अर्थमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवून दिवाळी सणाच्या आधी सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र बक्षी समितीच्या अहावालास विलंब होत असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवढ द्यावी, अशी संघटनांची मागणी आहे.
या आधी सहावा वेतन आयोग लागू करण्यास असाच विलंब झाल्यामुळे त्यावेळी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ देण्यात आली होती. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगासंदर्भातील बक्षी समितीच्या अंतिम अहवालाच्या अधीन राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ देण्याबाबत विचार सुरू आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही त्याबाबत सूतोवाच केले आहे. परंतु ही वाढ किती व कधीपासून द्यायची, याबाबत शासनस्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मदान यांनी सांगितले. त्याचबरोबर बक्षी समितीचा अहवालही लवकर प्राप्त होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |