11:25pm | May 24, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी या वर्षी 13 जुलै रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यासाठी जिलहाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज पालखी मार्गाची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यानंतर फलटण येथे झालेल्या बैठकीत प्राथमिक आढावा घेतला. या सोहळ्यात प्लॅस्टिक बंदी करणार असून पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी ॲप तयार करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे-पाटील, पालखी मालक बाळासाहेब हारफळकर, राजाभाऊ चोपदार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोईल, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा व स्चछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे . जगदाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, फलटण पंचायत समितीचे सभापती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातून पालखी निरा घाटावर सातारा जिल्ह्यात येते, त्या निरा घाटाची पाहणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केली. या नदी पात्रात 10 जुलै रोजी पाणी सोडावे जेणेकरुन दोन दिवस पाणी वाहून जावून तिसऱ्या दिवशी पात्रातील पाणी स्वच्छ राहील, अशा सूचना यावेळी जलसिंचन विभागाला त्यांनी दिल्या. तसेच चांदोबाचा लिंब येथे या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होते. त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजुला ते खडे आहेत, त्याचे सपाटीकरण करुन, वारकऱ्यांना रिंगण करताना कोणताही आडथळा येणार नाही असे रस्ते तयार करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांन यावेळी त्यांनी दिल्या.
तरडगाव येथे पालखीचा मुक्काम असतो, त्या तरडगावातील हमरस्त्यावर अर्धवट अवस्थेत एका पुलाचे बांधकाम आहे, त्याचे मोठे मोठे गज बाहेर आले आहेत, ते सर्व गज काढून कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या. तरडगावच्या मैदानावर पाणी, पुरेसे स्वच्छता गृहे कुठे आणि कसे असतील या संदर्भात सूचनाही त्यांनी केल्या. पालखी मार्गावर जिथे जिथे आवश्यक आहे तिथ तिथे पथ दिवे तात्काळ बसवावेत. बरड मुक्कामाच्या ठिकाणी हायमार्क्स लावले आहेत, त्याची पाहणी करुन पिण्याची सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना केल्या.
प्लॅस्टीक बंदी :
पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांसाठी अनेकजन अन्नदान करतात, यावेळी मोठ्या प्रमाणात थरमाकोल आणि प्लॅस्टीकचे कप याचा वापर होतो. याचे विघटन होत नसल्याने अनेक परिणाम होतात, पावसाळ्यात नदी, नाले तुंबव्याबरोबर माती प्रदुषण होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता राज्यात प्लॅस्टीक बंदी केलेली आहे. या पालखी सोहळ्यात कोणत्याही अन्नदात्याने थरमाकोल किंवा प्लॅस्टीकचा वापर करु नये, असा वापर केला तर आपण दंडात्मक कारवाई करु असा इशारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी दिला.
आरोग्य खात्याने पालखी मार्गावरील सर्व पाण्याचे स्त्रोत पालखी सोहळ्याच्या पूर्वीपासूनच तपासणी करुन ते शुद्ध आहेत, याची खात्री करुन घ्यावी. कोणतेही जलस्त्रोत तपासणी शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी वापरु देवू नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 13 जुलै ते 16 जुलै या दरम्यान पालखी सातारा जिल्ह्यात असणार आहे. त्या काळात त्या त्या विभागाने काय पूर्व तयारी केली आहे, याचा प्रत्येक विभाग निहाय यावेळी आढावा घेण्यात आला. पालखी सोहळा विश्वस्तांकडून ज्या ज्या सूचना यावेळी आल्या, त्या सूचनांची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना अंमलबजावणी करण्यास यावेळी सांगितले. या संदर्भात आपण पुन्हा लवकरच आढावा घवून आज सूचना केल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीबाबत कोणत्या विभागाने काय केले हे पाहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
पालखी सोहळा 2018 ‘ॲप’
सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी एक खा ॲप तयार करण्यात आले असून त्या ॲपमध्य या पालखी सोहळ्यातील संपूर्ण व्यवस्थापन कसे असेल, पाण्याचे स्त्रोत कुठे आहेत, स्वच्छता गृह कुठे आहे, आरोग्य व्यवस्था कुठे आहे, योबरोबर संबंधितांचे नंबरही या ॲपमध्ये देण्यात येणार आहेत. गुगल प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करता येईल. या ॲपमुळे एक उत्तम व्यवस्थापन होणार असून 24 तास या काळात यंत्रणा अलर्ट राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |