02:21am | Jan 17, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्याच्या विद्यमान निष्क्रीय जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांची पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर बदली झाल्यामुळे जिल्हावासियांसह महसुलातील अधिकार्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला असून त्यांच्या जागी अतीशय कार्यक्षम अशा शेखर सिंग यांची गडचिरोली जिल्हाधिकारी पदावरुन बदली झाली आहे.
एप्रिल 2017 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर श्रीमती श्वेता सिंघल यांची नियुक्ती झाली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी वंदना खुल्लर यांच्यानंतर जिल्ह्याचा कारभार एका महिलेच्या हाती म्हणजेच श्वेता सिंघल यांच्या हातात आला होता. सुबराव पाटील, विकास देशमुख, संभाजीराव कडू-पाटील, डॉ. रामास्वामी एन्, अश्विन मुद्गल या जिल्हाधिकार्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा सातारा जिल्ह्याच्या प्रशासनावर उमटवला होता. मात्र, श्वेता सिंघल यांच्याकडून एक महिला म्हणून जिल्हावासियांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र त्यांनी या अपेक्षांचा भंग केला. उलट, तेटली येथील बोगस सातबारा प्रकरण, महाबळेश्वर येथील विनापरवाना हॅलिकॉप्टरचे लॅन्डिंग व टेक ऑफ, लोकसभा-विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, सातारा येथील बांधकाम ठेकेदार गडोख याच्या केंजळ येथील दगड खाण व क्रशरवर तक्रारींचा पाऊस पडूनही त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई न करता त्याला सॉफ्ट कॉर्नर देणे, जिल्ह्यातील बेसुमार वाळू उपशावर निर्बंध ठेवण्यात अपयशी, सातारा शहरासह जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिकांना जाचक अटी व नियम लावल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान करणे, अशाप्रकारचे आरोप जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या कार्यकाळात झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात विशेष अशी दखलपात्र कोणतीही कामे झालेली नाहीत. बाकी प्रशासन म्हटल्यानंतर काम करावेच लागते. त्यामुळे उगाचच जिल्हा माहिती अधिकार्यांतर्फे पाठ थोपटून घेणे काही कामाचे नाही.
नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंग हे 2016 सालच्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अतिशय चमकदार कामगिरी बजावली आहे. तसेच गडचिरोली येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना तेथेही अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्याला व देशाला दिशा देणार्या सातारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्यावर काम करण्याची जबाबदारी आलेली आहे. गेल्या तीन वर्षात सातारा प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. सुबराव पाटील ते अश्विन मुद्गल या जिल्हा प्रशासनातील सुवर्णकाळाची धुरा त्यांना आता सांभाळायची आहे.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |