05:55pm | Jan 23, 2020 |
सातारा : मुरुम, ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असणार्या झाडांवर येथील ग्रा.पं. सदस्यानेच कुर्हाड चालवून तब्बल 10-15 मोठ्या झाडांची कत्तल केल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करुन कारवाई न झाल्यास 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुम, ता. फलटण येथील जि.प. शाळेच्या आवारात 35-40 वर्षांपासून पिंपळ, पिपरण, अशोक व सुरु जातीची मोठ्ठाले वृक्ष लावण्यात आले होते. या वृक्षापासून शाळेला व मुलांनाही कसल्याही प्रकारचा धोका नसताना येथील ग्रा.पं. सदस्यासह दोघांनी संगनमताने पैसे कमविण्याच्या हेतूने झाडांवर कुर्हाड चालवून त्यांची कत्तल केली आहे. शासन झाडे लावा, झाडे जगवा यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे, लोकांमध्ये प्रबोधन करीत आहे. असे असताना ग्रा.पं. सदस्यानेच वनविभागाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या वृक्षांची कत्तल करुन त्यांची विक्री केली आहे. याबाबत येथील महादेव तात्याबा संकपाळ व ग्रा. पं. सदस्य रमेश दगडू बोंद्रे यांच्यासह शंकर जयसिंग गोरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुभाष पोपटराव बोंद्रे व सतीश निवृत्ती बोंद्रे (रा. मुरुम, ता. फलटण) यांनी तहसिलदार फलटण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबत प्रशासनाने कारवाई न केल्यास दि. 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताकदिनी तहसिलदार कार्यालय फलटण येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |