वाई : मोबाईल चोरीच सत्र थांबता थांबत नसून आज चोरट्यांनी चक्क दुचाकीवरून येऊन महाविद्यालयीन युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकली. वाई गणपती घटावर मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
महाविद्यालयीन युवती महागणपती पुलावरून बसस्थानकाच्या दिशेने मोबाईल वरून बोलत जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात तरुणांनी तिच्या जवळ जाऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाने युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून धूम ठोकली. संबंधित युवती चोर ... चोर... म्हणत जोरात ओरडली. काही अंतर ती त्यांच्या मागे पळत गेली. मात्र वेगाने गेलेले ते दोघे तरुण काही वेळातच गायब झाले. चोरट्यांनी वापरलेल्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींना दुचाकींचा नंबर घेता आला नाही. नंतर काही वेळाने त्याठिकाणी आलेले स्थानिक तरुणांनी त्या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही. घाबलेल्या त्या युवतीने पोलीस स्टेशन ऐवजी घरचा रस्ता धरला.
शहरात चोरट्यांनी अक्षरशः सुळसुळाट घातला असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून दिवसा ढवळ्या महागडे मोबाईल लांबवू लागले आहेत. काही वेळातच चोरट्यांकडून मोबाईल बंद केले जात असल्याने पोलिसांना लोकेशन शोधणे ही अवघड होऊन बसले आहे. वाई पोलिस ठाण्याचे डी. बी. पथक कोठे आहे.? असेल तर चोरटे पकडण्यासाठी ते आपली तपास यंत्रणा का राबवत नाही.? असा प्रश्न वाईकर विचारत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |