01:09am | Feb 10, 2020 |
मसूर : मुलांच्या उत्तम भविष्यासाठी चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या मातापित्यांचा नीट सांभाळ न करण्याचे विदारक अनुभव समाजात एकिकडे पहायला मिळत असताना आदर्श मातापित्यांचा होत असलेला सन्मान समाजाला दिशा देणारा आहे. आपल्या मातापित्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी मसूरमध्ये राबवल्या जात असलेल्या या उपक्रमातून इतरांनी यातून बोध घ्यावा, असे भावपूर्ण विचार बालचित्रवाणीचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते ज्योतिराम कदम यांनी व्यक्त केले.
लोकसाहित्यिक जानका चेणगे व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र चेणगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श माता - पिता पुरस्कार पुसेसावळी (ता. खटाव) येथील रंजना व विलास लोखंडे या निवृत्त शिक्षक दांपत्यास कदम यांच्या हस्ते जानका चेणगे यांच्या प्रथम स्मृतीदिनी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द ग्रामीण कथाकार बबन पोतदार होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, डॉ. विश्वास धायगुडे, सह्याद्रि साखर कारखान्याचे संचालक लहूराज जाधव, संजय जगदाळे, सुदाम दीक्षित, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, श्रीकांत जिरंगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लोकसाहित्यासाठी स्व. जानका चेणगे यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यांनी रचलेले काव्य अप्रतिम दर्जाचे आहे. त्यांच्याकडील मौखिक स्वरूपात असलेले लोकसाहित्य अक्षरबध्द करून जतन करण्याचे मौलिक कार्य स्वाती बाजारे यांनी केले आहे, असे सांगून कदम यांनी यावेळी रूखवताच्या रचना सादर केल्या. मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी जानका चेणगे यांच्या आठवणींना उजाळा दिला. गुंफण परिवाराने सीमाभागात साहित्य संमेलन घेऊन मराठी अस्मिता जपण्याचे दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. या परिवाराने ही परंपरा पुढे चालवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुलांवर बालवयातच सुसंस्कार करून त्यांना घडवण्याचे काम त्यांचे मातापिता करीत असतात. आई ही प्रत्येकाचा पहिला गुरू असते. ती प्रत्यक्ष परमेश्वर असते. जगाची निर्मिती केल्यावर प्रत्येक घरात आणि घरट्यात जावून वास्तव्य करणे ही गोष्ट अशक्यप्राय आहे हे जेव्हा परमेश्वराच्या लक्षात आले तेव्हा त्याने आई निर्माण केली आणि तिच्या रूपाने तो प्रत्येक घरात वावरू लागला.
जानकीमाई या आमच्यासाठी परमेश्वरच होत्या. त्यांच्या घराण्याशी आमचे प्रथमपासून कौटुंबिक नाते होते, असे ग्रामीण कथाकार बबन पोतदार यावेळी म्हणाले. आदर्श माता - पिता पुरस्काराच्या माध्यमातून स्मृती जपण्याचा एक वेगळा पायंडा चेणगे परिवाराने पाडला असल्याचे मधुबुवा दीक्षित म्हणाले. भाग्यवंतांची सेवा प्रार्थना करून मागावी लागते. मला तर ही संधीच मिळाली असे उद्गार सज्जन यादव यांनी काढले. जानका चेणगे हे लोकसाहित्याचे चालते बोलते विद्यापीठ होते. हा आईचा ठेवा स्वाती यांनी पुस्तकरूपाने जपून ठेवला आहे असे लालासाहेब अवघडे म्हणाले. यावेळी नंदकुमार जगदाळे, डॉ. विश्वास धायगुडे, अरूणा गद्रे, दिपाली लोखंडे यांचीही भाषणे झाली. विलास लोखंडे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मानपत्राचे वाचन स्वाती बाजारे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |