04:49pm | Jul 16, 2019 |
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागातील कौसर बाग नावाच्या चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 40 ते 45 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे.
घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. परंतु दाटीवाटीचा परिसर आणि चंचोळ्या गल्ल्या यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आव्हान अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांसमोर आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या इमारतीचा भाग कोसळला. या इमारतीत 10 ते 15 कुटुंब राहत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची संख्या जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे कोसळलेली इमारत ही म्हाडाची आहे. ही इमारत जुनी आहे. मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वीच धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. परंतु त्या यादीत या इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे ही इमारत नेमकी कशी कोसळली हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या दुर्घटनेनंतर कौसर बाग इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्या करण्याचं काम सुरु झालं आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |