RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

काश्मीरमध्ये जैशच्या मोस्ट वाँटेड अतिरेक्याला अटक

01 April 2019 at 16:23

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात दहशत निर्माण करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने श्रीनगर येथून लोनला अटक केली आहे. त्याच्यावर दोन लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, शिवाय त्याच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. 

आज सकाळीच पुलवामामध्ये सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लस्सीपोरा येथे ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोन याला अटक करण्यात आल्यानं दिल्ली पोलिसांना मोठं यश आलं आहे. २०१५ पासून पोलिसांना लोन हवा होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी केलं होतं. २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत अतिरेक्यांची चकमक झाली होती. त्यानंतर लोन फरार झाला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. 

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट; ५२ जणांचा मृत्यू

श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.

20 hours before

अखेर टीक टॉक देशातून हद्दपार

सोशल मीडियामध्ये तुफान लोकप्रिय ठरलेल्या टीक टॉक या ॲपवर अखेर देशात बंदी घालण्यात आली आहे. तीन एप्रिलला मद्रास उच्च न्यायालयाने टीक टॉक ॲप पोर्नोग्राफीला उत्तजेन देत असल्याचा ठपका ठेवत केद्र सरकारला त्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.

18 April 2019 at 03:03